नवी मुंबई विमानतळाचे काम प्रगतिपथावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 06:42 AM2018-04-17T06:42:04+5:302018-04-17T06:42:04+5:30

नवी मुंबई : शहराला खऱ्या अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त करून देणा-या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे.

विमानतळाच्या गाभा क्षेत्रात भरावाचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच प्रकल्पाच्या मार्गात मुख्य अडसर ठरलेल्या उलवे टेकडीच्या उत्खननाच्या कामानेही गती घेतली आहे.

विशेष म्हणजे विमानतळाच्या गाभा क्षेत्रात असेल्या १० गावांच्या स्थलांतरणाची प्रक्रियासुद्धा गतिमान झाली आहे.

ग्रामस्थांनी आपली घरे तोडून स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.एकूणच देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे.

या प्रकल्पाच्या कामाचा ‘लोकमत’चे छायाचित्रकार भालचंद्र जुमलेदार यांनी घेतलेला सचित्र आढावा.