अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 01:08 PM 2024-10-11T13:08:11+5:30 2024-10-11T13:17:33+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं विमान उतरलं. भारतीय हवाई दलाच्या सी २९५ या हे विमान पहिल्या धावपट्टीवर उतरले. नवी मुंबई विमानतळावर उतरलेल्या हवाई दलाच्या विमानाची खास छायाचित्रे पहा सिडको आणि महायुती सरकारसाठी महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अखेर पहिलं विमान उतरलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख अधिकारी या धावपट्टी चाचणीवेळी उपस्थित होते.
२०२५ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कामाला वेग आला असून, पूर्ण झालेल्या पहिल्या धावपट्टीवर भारतीय वायू दलाचे सी-२९५ हे विमान उतरवण्यात आले.
धावपट्टीवर उतरण्यापूर्वी सी-२९५ विमानाने आकाशात सात ते आठ घिरट्या घातल्या. त्यानंतर विमान यशस्वीपणे नवी मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर उतरवण्यात आले. विमान यशस्वीपणे उतरल्यानंतर वॉटर सॅल्यूट करण्यात आला.
सी-२९५ विमानाबरोबरचं सुखोई ३० नेही विमानतळावर आधी घिरट्या मारल्या आणि नंतर विमानतळावर लँडिंग करण्यात आले. आजूबाजूला हिरवाई असल्याने विमान लँडिंग होतानाचे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावे असेच होते.
हवाई दलाचे सी-२९५ विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानात जाऊन वैमानिकांचे अभिनंदन केले. तसेच धावपट्टीची पाहणी केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सिडकोच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. या विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात आले आहेत. विमातळावर चार टर्मिनल असणार आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकाचवेळी ३५० विमाने उभी केली जाऊ शकणार आहेत. या विमानतळापर्यंत जाण्यासाठी मेट्रो असणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं विमान उतरलं. भारतीय हवाई दलाच्या सी २९५ या हे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर हवेत घिरट्या मारताना सुखोई-३० विमान..