विरोधी विचारधारेचे सगळे नेते एकत्र; पाहा महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीतील ऐतिहासिक छायाचित्रे By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 09:15 PM 2019-11-25T21:15:19+5:30 2019-11-25T21:19:00+5:30
राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र महाविकासआघाडीची स्थापना केली आहे. भाजपाविरोधात हे तीन पक्षांच्या विरोधी विचारधारेचे नेते एकत्र पाहायला मिळाले
सांताक्रूझ येथील ग्रँड हयात या हॉटेलला आम्ही १६२ या कार्यक्रमातंर्गत सर्व आमदारांना एकत्रित आणण्यात आलं. त्यावेळी या आमदारांना पक्षाविरोधात कृत्य करणार नाही अशी शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित होते.
या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी तीन पक्षाचे तरुण आमदारही एकत्र येत एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसत होते.