धुरळा आणि गुलाल! राज्यात कुठल्या पक्षाने जिंकल्या किती ग्रामपंचायती? अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी By बाळकृष्ण परब | Published: January 18, 2021 09:01 PM 2021-01-18T21:01:50+5:30 2021-01-18T23:07:28+5:30
Maharashtra Gram Panchayat Election Results Update : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मुख्य लढत ही भाजपाप्रणित पॅनेल आणि महाविकास आघाडी किंवा या आघाडीतील प्रमुख पक्ष अशीच झाली. राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील प्रमुख पक्ष असलेले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपा, मनसे तसेच स्थानिक आघाड्यांना मतदारांनी दिलेला कौल आज ईव्हीएममधून समोर आला आहे.
या निवडणुकीमध्ये राज्यातील प्रमुख पक्षांनी स्वतंत्र पॅनेल तसे विविध संयुक्त स्थानिक पॅनेलच्या माध्यमातून एकमेकांना आव्हान दिले. मात्र मुख्य लढत ही भाजपाप्रणित पॅनेल आणि महाविकास आघाडी किंवा या आघाडीतील प्रमुख पक्ष अशीच झाली.
रात्री उशिरापर्यंत राज्यातील सुमारे १३ हजार ८३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी मिळून सहा हजारांहून अधिक ग्रामपंचायतींवर कब्जा केला. मात्र या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत राज्यातील प्रमुख पक्षाने जिंकलेल्या ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
भाजपा ग्रामपंचायत निवडणुकीत भादपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. रात्री उशिरापर्यंत आलेल्या निकालांमध्ये भाजपाने एकूण तीन हजार २३६ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. मात्र भाजपा नेत्यांकडून सहा हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवल्याचा दावा करण्याक आला आहे.
शिवसेना महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने या निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली आहे शिवसेनेला या निवडणुकीत सुमारे दोन हजार ८२० ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण महाराष्ट्रात भक्कम जनाधार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जा निवडणुकीत जोरदार कामगिरी केली. राष्ट्रवादीने संपूर्ण राज्यात मिळून २ हजार ९९७ ग्रामपंचायतींवर कब्जा केला.
काँग्रेस ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील अन्य पक्षांच्या तुलनेत काँग्रेस पक्ष काहीसा मागे पडल्याचे दिसून आले. काँग्रेसला दोन हजार १३१ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षाल चार ते साडे चार हजार ग्रामपंचायतीत विजय मिळाल्याचा दावा केला.
मनसे यावेळी प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीत उतरलेल्या मनसेनेही ३८ ग्रामपंचातींमध्ये बाजी मारली. मनसेचा विजय विशेष उल्लेखनीय ठरला.
स्थानिक आघाडी ग्रामपंचायत निवडणूक ही चिन्हावर होत नसल्याने विविध स्थानिक आघाड्याही रिंगणात असतात. आज लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निकालांमध्ये स्थानिक आघाड्यांनी एकूण २ हजार ४९७ ग्रामपंचायतींवर कब्जा केला.