पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 13:49 IST2018-09-24T13:44:16+5:302018-09-24T13:49:16+5:30

पुण्यात गणपती विसर्जनादरम्यान भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. गणपती विसर्जनदरम्यान लेझीम खेळणा-या महिलांच्या पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

तर अलका टॉकीज चौकात गर्दीतून अँब्युलन्सला वाट काढून देण्यात आली.

विशेष म्हणजे यावेळी महापौर मुक्ता टिळकही फुगडी घालताना पाहायला मिळाल्या.

तसेच कसबा गणपतीसमोर कातकरी नृत्यही सादर करण्यात आलं.

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जात, धर्म, पंथ फक्त भारतीय याचाही संदेश दिला आहे.