Happy birthday priyanka gandhi celebrating her 49th birthday vadra priyanka love story
दिल्लीतील एकाच शाळेत शिकत होते रॉबर्ट वाड्रा अन् प्रियंका गांधी; जाणून घ्या इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी By manali.bagul | Published: January 12, 2021 02:52 PM2021-01-12T14:52:42+5:302021-01-12T15:35:18+5:30Join usJoin usNext काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा या आज आपला ४९ वा वाढदिवस साजरा करणार आहे. प्रियांका यांचा जन्म आजच्या दिवशी १९७२ मध्ये देशातील सगळ्यात मोठ्या राजकीय घराण्यात झाला होता. राजकारणात सक्रिय असलेल्या प्रियांका गांधी यांची लव लाईफसुद्धा तितकीच चर्चेत होती. त्यांचे लग्न प्रसिद्ध व्यावसाईक रॉबर्ड वाड्रा यांच्याशी झाले. १८ जानेवारी १९९७ मध्ये या दोघांनी लग्न केलं आणि आज त्यांना एकत्र राहून २४ वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रियंका यांनीही आपले वडील राजीव गांधी यांच्याप्रमाणेच प्रेम विवाह केला. प्रियंका या दिल्लीतील व्यावसाईक रॉबर्ड वाड्रा यांच्या प्रेमात पडल्या. जेव्हा पहिल्यांदा त्या रॉबर्ड वाड्रांना भेटल्या तेव्हा त्यांचे वय १३ वर्ष होते. हळू हळू दोघांचे बोलणं सुरू झालं आणि बघता बघता मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालं. व्यावसायिक कुटुंबातले रॉबर्ट वाड्रा यांची राजकीय पार्श्वभूमी नव्हती. रॉबर्ट वाड्रा यांचा जन्म १ एप्रिल १९६९ रोजी उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद शहरात झाला. मुरादाबाद पितळ कामासाठी प्रसिद्ध आहे. वाड्रांचे वडील राजेंद्र वाड्रा हे पितळाचे उद्योगपती होते. रॉबर्ट वाड्रांचा संबंधही पाकिस्तानमधील सियालकोटशी आहे. वास्तविक, फाळणीच्या वेळी रॉबर्ट वाड्राचे आजोबा सियालकोटहून भारतात आले होते. रॉबर्ट वाड्रा आणि प्रियांका एकाच शाळेत शिकत होते. दोघांची भेट रॉबर्ट वाड्राची बहीण मिशेल वाड्रा यांच्यामार्फत झाली. तेव्हापासून हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले होते. रॉबर्ट वाड्रा यांचे कुटुंब पितळ व कृत्रिम दागिन्यांच्या व्यवसायात होते. रॉबर्ट अनेकदा प्रियांकाला खास ज्वेलरी गिफ्ट म्हणून देत असत. वाड्रा लवकरच प्रियंका यांचा भाऊ राहुल गांधी यांचेही चांगले मित्र बनले. एकदा प्रियंका रॉबर्ट यांना मुरादाबादला भेटायला आल्या तेव्हा त्यांच्या प्रेमसंबंधांविषयी चर्चा सुरू झाल्या. त्याच्या नात्याबद्दल कोणालाही कळू नये असं रॉबर्ट त्यांना वाटत होते. रॉबर्ट वाड्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ''आम्ही दिल्लीतील ब्रिटीश शाळेत शिकत असताना भेटलो. मला वाटलं की तिला माझ्यात रस आहे. आम्ही दोघे एकमेकांशी बरीच चर्चा करायचो पण लोकांना त्याबद्दल माहिती मिळायला नको होती कारण कदाचित लोकांनी ते चुकीच्या पद्धतीने घेतले असते.'' प्रियंका यांच्या आजूबाजूला कडेकोट सुरक्षा बंदोबस्त होता, परंतु वर्गमित्र असल्याने रॉबर्ट आणि प्रियंका यांना एकमेकांना भेटण्याची संधी मिळत असे. रॉबर्ट वाड्रा यांनी थेट प्रियंकाकडे लग्नाचा प्रस्ताव दिला. प्रियंका आणि तिच्या कुटुंबीयांना रॉबर्ट लहानपणापासूनच माहित होते, म्हणून प्रियंकाने त्वरित सहमती दर्शविली. जेव्हा प्रियंका-रॉबर्ट यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोघांनीही आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगितले. रिपोर्ट्सनुसार रॉबर्टचे वडील या लग्नासाठी आधी तयार नव्हते पण त्यानंतर लग्नाला मान्यता दिली. 18 फेब्रुवारी 1997 रोजी दोघांचे लग्न झाले. दोघांनी त्यांचे लग्न सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी हिंदू प्रथांनी केले. प्रियंका आणि रॉबर्टला मिराया वाड्रा आणि रेहान वाड्रा अशी दोन मुलंही आहेत. संपूर्ण कुटुंब गुडगाव येथे राहते. रॉबर्ट एकतर श्रीमंत कुटुंबातील नव्हते किंवा त्यांच्याकडे खास कौशल्यही नव्हता. ते बर्याच परीक्षांमध्ये नापासही झाले आहेत. परंतु रॉबर्ट यांचा साधेपणा प्रियंका यांना आवडले आणि दोघांनीही आपले संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला. अत्यंत कठीण परिस्थितीतही प्रियांका आणि रॉबर्ट एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि यामुळे त्यांची लव्हस्टोरी एका उदाहरणामध्ये बदलली आहे.टॅग्स :रिलेशनशिपप्रियंका गांधीरॉबर्ट वाड्राकाँग्रेसदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टrelationshipPriyanka Gandhirobert vadracongressLove Story