मला माफ कर बाळा! गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर उसळली संतापाची लाट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 12:06 IST2020-06-04T11:23:17+5:302020-06-04T12:06:23+5:30

कोरोनाच्या माहामारीत लोकांना माणसातला देव दिसला पण केरळमधील घटनेने मात्र माणूसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केरळमधील भूकेने व्याकुळ असलेली गर्भवती हत्तीण काहीतरी खायला मिळेल या आशेनं केरळ येथील मलाप्पूरम येथील एका वसाहतीत गेली.
पण, तेथील लोकांनी तिला अननसातून फटाके खायला दिले. अननसाचं आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट, बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीणीला हे समजण्यात विलंब झाला आणि तिनं तो पदार्थ अननस म्हणून खाल्ला.
त्यानंतर तिच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट झाला. असह्य वेदनेसह ती तेथून पळाली आणि एका नदीत जाऊन उभी राहिली. अनेक तास तात्काळत ही हत्तीण पाण्यात उभी होती.
हत्तीणीच्या केलेल्या निर्घुण हत्येनंतर सर्वच स्तरातून मोठा संताप व्यक्त होत आहे. एका मुक्या प्राण्याची निष्ठुरपणे हत्या केल्यानंतर बॉलिवूडपासून ते राजकीय नेत्यापर्यंत सर्वांकडूनच तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.