6 places in worlds largest continent asia you must visit
पर्यटनासाठी आशियातील 'हे' पर्याय सर्वात भारी By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 07:48 PM2019-05-13T19:48:49+5:302019-05-13T19:51:59+5:30Join usJoin usNext राजा ऍम्पेट, इंडोनेशिया- घनदाट किनारे, स्वच्छ आणि सुंदर किनारे पाहायचे असतील, तर हे ठिकाण सर्वोत्तम आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक प्रजाती या बेटावर पाहायला मिळतात. केरळ, भारत- कोणत्याही हंगामात केरळ पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे. हिल स्टेशन मुन्नार, हाऊसबोटचं शहर अलेप्पी, कोच्ची, एर्नाकुल अशी अनेक उत्तमोत्तम ठिकाणं केरळात आहेत. सिंगापूर- सिंगापूरला निसर्गानं अगदी भरभरुन दिलं आहे. डोंगर, जंगल, झरे, बगिचे असे बरेच उत्तम पर्याय या ठिकाणी आहेत. शीआन, चीन- चिनी संस्कृतीची सुरुवात चीनमधून झाली, असं मानलं जातं. शीआन चीनमधलं प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. अस्ताना, कजाकस्तान- हे शहर तिथल्या वास्तूशिल्पांसाठी जगात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी व्हिसाशिवाय 30 दिवस फिरता येतं. श्रीलंका- हा देश निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो. एलात जंगलातून जाणारी ट्रेन, पिन्नालातली एलिफंट सफारी असं बरंच काही श्रीलंकेत पाहण्यासारखं नाही. टॅग्स :पर्यटनश्रीलंकासिंगापूरकेरळtourismSri LankasingaporeKerala