केरळला फिरण्यासाठी जाताय? मग, IRCTC नं आणलंय खास पॅकेज, येईल फक्त इतका खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 12:21 PM2024-07-11T12:21:14+5:302024-07-11T12:27:20+5:30

Celestial Kerala Tour ex Mumbai असे या पॅकेजचे नाव आहे.

दक्षिणेकडील राज्य केरळ हे संपूर्ण देशात आणि जगात आपल्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही या वर्षी केरळला भेट देण्याचा विचार करत असाल, तर IRCTC तुमच्यासाठी स्वस्त आणि अप्रतिम टूर पॅकेज घेऊन आले आहे.

Celestial Kerala Tour ex Mumbai असे या पॅकेजचे नाव आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला कोची, मुन्नार, थेक्कडी आणि कुमारकोमला भेट देण्याची संधी मिळेल.

हे पॅकेज पूर्ण 6 दिवस आणि 5 रात्रीसाठी आहे. पर्यटकांना मुंबईहून कोचीला जाण्यासाठी विमान सुविधा मिळत आहे. तसेच, मुंबई ते केरळ या पॅकेजमध्ये तुम्हाला जेवणात नाश्ता आणि रात्रीचे जेवण दोन्हीची सुविधा मिळत आहे.

दुपारच्या जेवणाची व्यवस्था तुम्हाला स्वतः करावी लागेल. या पॅकेजमध्ये पर्यटकांना थ्री स्टार हॉटेल तसेच ट्रॅव्हल इन्शुरन्सचा लाभ मिळत आहे. पॅकेजमध्ये जीएसटीचाही समावेश आहे.

सिंगल ऑक्यूपेंसीवर एका व्यक्तीसाठी 54,300 रुपये, डबल ऑक्यूपेंसीसाठी 41,300 रुपये आणि ट्रिपल ऑक्यूपेंसीसाठी 40,300 रुपये शुल्क द्यावे लागेल. तुम्ही 1 ऑक्टोबर 2024, 11 फेब्रुवारी आणि 4 मार्च 2025 रोजी पॅकेजचा आनंद घेऊ शकता.