Let's move around the hill station with the family
चला, कुटुंबासह 'हिल स्टेशन' फिरूया By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 06:21 PM2018-10-15T18:21:49+5:302018-10-15T18:28:00+5:30Join usJoin usNext केरळमधील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी कुटुंबाला घेऊन एकदा तरी केरळला भेट द्यायलाच हवी. निळा समुद्र, नारळाची झाडं, शुद्ध हवा आणि डोंगराळ प्रदेश. राजस्थानची सवारी म्हणजे अविस्मरणीय असाच अनुभव आहे. आपल्या चिमुकल्या मुलांना घेऊन राजस्थान आणि तेथील उंटांची सवारी करायलाच हवी. येथील वाळवंटी नक्कीच पाहण्यासारखे आहेत. तामिळनाडूतील मुदुमलाई हे प्राणी अभियारण्यही आपल्या मुलांसह फिरायला हरकत नाही. वाईल्ड लाईफ सफारी करण्यासाठी मुदुमलाई येथील अभयारण्य उत्तम अन् सेफ आहे. तामिळनाडूतील पाँडेचरी हे लहान मुलांसाठी सर्वात सुरक्षित आणि आनंद देणारे ठिकाण आहे. चेन्नई विमानतळावरुन तुम्ही स्वत: ड्रायव्हींग करुन येथील दुतर्फा निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता. भारताच्या उत्तर पूर्वेला असलेलं एक हिल स्टेशन म्हणजे शिलाँग. येथील मार्केटमध्ये खरेदी करण्याचा एक भन्नाट अनुभव घेता येईल. लग्नानंतर एकदा तरी अंदमानला भेट द्यायला हवीच. अंदमान हे भारतातील एक उत्कृष्ट अन् निसर्गरम्य आईसलँड आहे. परमनंट आठवणींसाठी येथे जायलाच हवं. टॅग्स :पर्यटनकेरळतामिळनाडूtourismKeralaTamilnadu