महाआघाडीचे पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल ,अजित पवार यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 02:01 PM2019-04-09T14:01:07+5:302019-04-09T14:28:07+5:30
वाल्हेकरवाडी येथून रॅली काढत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप महाआघाडीचे पार्थ पवार यांनी मंगळवारी (दि. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला.
पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप महाआघाडीचे पार्थ पवार यांनी मंगळवारी (दि. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला. वाल्हेकरवाडी येथून रॅली काढण्यात आली. पार्थ यांचे वडील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाऊ जय पवार आदी रॅलीत सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करण्यापूर्वी पार्थ यांनी पिंपरीतील एच एस कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज, पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, मोरवाडी येथे अहल्यादेवी होळकर, निगडीत अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. चिंचवड येथे क्रांतिकारक चापेकर बंधू यांच्या स्मारकास अभिवादन केले. त्यानंतर वाल्हेकरवाडी येथून रॅली काढण्यात आली. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पुण्याचे अंकुश काकडे आदी रॅलीत सहभागी झाले होते.
मावळ लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे श्रीरंग बारणे व राष्ट्रवादीचे पार्थ पवार समोरासमोर आले असता एकमेकांना शभेच्छा दिल्या..
महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांची अर्ज दाखल करण्यावेळी अनुपस्थिती
पार्थ पवार यांचा उमेदवारी दाखल करण्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सह काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते मंडळी, स्टार प्रचारक या सर्वांनीच मात्र पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.