"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 04:21 PM2024-09-30T16:21:54+5:302024-09-30T16:23:52+5:30

हरियाणात झालेल्या प्रचारसभेमध्ये बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानी-अंबानींच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.

As much money as Modi gave to Adani, I will give it to the poor, what did Rahul Gandhi say? | "मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?

"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?

 Rahul Gandhi PM Modi : 'मोदीजी वादळाच्या वेगाने गरिबांच्या खिशातून पैसा काढून घेत आहेत आणि त्सुनामीच्या वेगाने अदानींच्या बँक खात्यात जमा करत आहे", असे म्हणत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. "जितका पैसा त्यांनी (मोदी) त्यांच्या मित्रांना दिला आहे, तितका पैसा देशातील गरीब, शोषित आणि वंचितांना देईन", अशी घोषणा राहुल गांधींनी केली. 

हरियाणा विधानसभा निवडणुकासाठी राहुल गांधींची नारायणगढमध्ये प्रचारसभा झाली. यासभेत बोलताना राहुल गांधींनी मोदींना अदानी-अंबानींचे नाव घेत डिवचले.

गरिबांच्या खात्यात पैस जमा करेन -राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, "गरीब लोकांच्या खिशात किती पैसे जाताहेत आणि किती पैसे बाहेर येत आहेत. हेच माझे सूत्र आहे. हे मी सोडणार नाहीये, जिथे मला मला संधी मिळेल... जे या देशाला चालवत आहेत. शेतकरी, मजूर, गरीब लोक, रक्ताचं पाणी करून चालवतात. जिथे मला दिसेल, तिथे मी त्यांच्या खात्यात पैसे टाकेन." 

"मोदींची तुमचा २४ तास आदर करतात आणि २४ तास तुमच्या खिशातून पैसे गेले, तर सन्मान होईल पण उपाशी मरावं लागेल. माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे की, गरिबांच्या खिशात त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, भविष्यासाठी; त्यांच्या बँक खात्यात किती पैसे आहेत?", असा सवाल राहुल गांधींनी उपस्थितांना केला. 

"अदानींच्या खात्यात त्सुनामीसारखा पैसा जमा होतोय"

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, "अदानींबद्दल विचार करा. दररोज सकाळी, २४ त्यांच्या बँक खात्यात धडाधड धडाधड पैसे येतात. सतत, म्हणजे जशी त्सुनामी येते ना, त्सुनामीसारखा पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. तुमच्या बँक खात्यातून वादळासारखा पैसा निघून जात आहे. माझे उद्दिष्ट्य आहे की, जितका पैसा यांनी अदानी-अबांनींना दिला आहे, तितका पैसा देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार,दलित, गरिबांच्या खात्यात टाकणार आहे", असे आश्वासन राहुल गांधींनी दिले. 

"आधारभूत किंमत देऊन, कर्जमाफी करून अशा पद्धतीने पैसे देईन. जितका पैसा नरेंद्र मोदींनी यांना (अदानी-अंबानी) दिला ना, तुम्ही तितका पैसा काँग्रेस पक्ष गरिबांना देईन. साधी गोष्ट आहे, जितका पैसा तुम्ही त्यांना देता, तितका गरिबांनाही द्यावा लागेल", अशी टीका राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर केली.

Web Title: As much money as Modi gave to Adani, I will give it to the poor, what did Rahul Gandhi say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.