Bihar Election 2020 : "तुमच्यासमोर नतमस्तक होणार आणि काम दुसऱ्याचं करणार; जिथे जातात, तिथे खोटं बोलतात"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 03:30 PM2020-10-23T15:30:24+5:302020-10-23T16:31:41+5:30

Bihar Election 2020 Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी प्रचार सभेतून मोदींवर पलटवार केला. विविध मुद्द्यांवरून पंतप्रधानांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. 

Bihar Election 2020 Congress Rahul Gandhi Slams bjp narendra modi in bihar | Bihar Election 2020 : "तुमच्यासमोर नतमस्तक होणार आणि काम दुसऱ्याचं करणार; जिथे जातात, तिथे खोटं बोलतात"

Bihar Election 2020 : "तुमच्यासमोर नतमस्तक होणार आणि काम दुसऱ्याचं करणार; जिथे जातात, तिथे खोटं बोलतात"

Next

नवी दिल्ली - बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असताना बिहार मागे पडला. बिहारची 10 वर्षे वाया गेली, अशा शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. यानंतर राहुल गांधी यांनी प्रचार सभेतून मोदींवर पलटवार केला. विविध मुद्द्यांवरून पंतप्रधानांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. 

"तुमच्यासमोर नतमस्तक होणार आणि काम दुसऱ्याचं करणार; जिथे जातात, तिथे खोटं बोलतात" असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. नवादा जिल्ह्यातील हिसुआमध्ये राहुल गांधी व तेजस्वी यादव यांची संयुक्त बदलाव संकल्प रॅली झाली. या रॅलीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. "बिहारमधील जे सैनिक शहीद झाले, त्यांच्यासमोर पंतप्रधान नतमस्तक होत आहेत. संपूर्ण देश शहिदांसमोर नतमस्तक होतो. प्रश्न नतमस्तक होण्याचा नाही. जेव्हा बिहारमधील जवान शहीद झाले, त्या दिवशी पंतप्रधान काय म्हणाले हा प्रश्न आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

"चीनला परत कधी हद्दपार करणार?"

"लडाखमध्ये देशाची सीमा आहे. त्या सीमेवर बिहार, उत्तर प्रदेश व इतर राज्यातील तरुण देशाचं संरक्षण करतात. उपाशी राहतात, पण परत येत नाहीत. प्रश्न हा आहे की, चीनच्या जवानांनी आपल्याला जवानांना शहीद करून 1200 किमी जमीन घेतली. चीनी भारतीय हद्दीत घुसले होते, तेव्हा मोदी असं का म्हणाले होते की भारतात कुणीही घुसखोरी केली नाही. आज म्हणतात नतमस्तक होतो. पण खोटं बोलून त्यांनी शहिदांचा अपमान केला. आता प्रश्न आहे की चीनला परत कधी हद्दपार करणार?"

"जिथेही जातात, तिथे खोटं बोलतात"

"बिहारी लोकांशी खोटं बोलू नका. तुम्ही सांगा किती लोकांना रोजगार दिला. मागील निवडणुकीत म्हणाले होते दोन कोटी तरुणांना रोजगार देणार. कोणाला मिळाला का? येतात आणि म्हणतात शेतकरी, जवान आणि मजुरांच्या समोर मी नतमस्तक होतो. घरी गेल्यावर अंबानी व अदानीचं काम करतात. तुमच्यासमोर नतमस्तक होणार, भाषण देणार पण काम करायची वेळ आली की, दुसऱ्याचं करणार. नोटबंदी केली. आपल्याला फायदा झाला का? तुमचा पैसा घेतला आणि भांडवलदारांचं कर्ज माफ केलं. लाखो लोकांना बेरोजगार करणार आहेत आणि जिथेही जातात तिथे खोटं बोलतात" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

गलवान खोऱ्यात, पुलवामा हल्ल्यात तिरंग्यासाठी बिहारचे सुपुत्र शहीद झाले- पंतप्रधान मोदी

गलवान खोऱ्यात बिहारचे जवान शहीद झाले. मात्र त्यांनी भारतमातेची मान झुकू दिली नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही बिहारच्या जवानांनी बलिदान दिलं. त्यांनी मी शतश: वंदन करतो, असं मोदी पुढे म्हणाले. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 'एनडीए सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवलं. आम्ही सत्तेत आलो तर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू करू, असं विरोधक म्हणतात आणि वर बिहारमध्ये येऊन इथल्या जनतेकडे मतं मागण्याची हिंमत करतात. हा बिहारमधील जनतेचा अपमान नाही का?', असा सवाल मोदींनी उपस्थित केला. बिहार आपल्या सुपुत्रांना देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर पाठवतो. पण कलम 370 पुन्हा आणू म्हणून विरोधक त्या सुपुत्रांचा आणि बिहारचा अपमान करतात, असं मोदी म्हणाले.

Web Title: Bihar Election 2020 Congress Rahul Gandhi Slams bjp narendra modi in bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.