"काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज, तो बुडतच चाललाय"; भाजपा नेत्याची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 10:23 AM2021-06-17T10:23:18+5:302021-06-17T10:29:28+5:30
BJP Gaurav Bhatia And Congress : भाजपा नेते आणि प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - भाजपानेकाँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस (Congress) पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा असल्याचं म्हणत भाजपा नेते आणि प्रवक्ते गौरव भाटिया (BJP Gaurav Bhatia) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर गांधी परिवाराच्या नेतृत्वावरही त्यांनी टीका केली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या चर्चेमध्ये ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. चर्चेदरम्यान निवेदकाने त्यांना विचारलं की, आता तुमच्याकडे एक ताजं उदाहरण आहे. मुकूल रॉय जे आजपर्यंत तुमच्यासोबत होते ते आता पुन्हा ममता बॅनर्जींच्या बाजूला गेले आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यावर भाटिया यांनी उत्तर दिलं आहे.
"एखाद्या पक्षाची ओळख म्हणजे त्याची विचारधारा आणि नेतृत्व असतं. भारतीय जनता पार्टीची विचारधारा स्पष्ट आहे आणि आमचं नेतृत्व म्हणजे मोदीजी देशातच नव्हे तर जगभरातलं सर्वात खंबीर नेतृत्व आहे. पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा आहे. तो बुडतच चालला आहे. बुडणार तर आहेच तो कारण राहुल गांधींच्या परिवाराव्यतिरिक्त जर कोणी उठून दिसू लागला तर त्याला दाबून टाकलं जातं, त्याला बाजूला केलं जातं. म्हणून पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू, राजस्थानात अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट आणि समाजवादी पार्टी तर एकाच परिवारातल्या सदस्यांनी तयार झालेली आहे. अध्यक्षही त्याच परिवारातील आहेत" असं म्हटलं आहे.
"हे खूपच दु:खद आणि निराश करणारं, काँग्रेसला स्थानिक पक्ष म्हटल्याने आश्चर्य वाटलं"#Congress#RahulGandhi#BJP#JitinPrasada#Politics#India#HarishRawathttps://t.co/cNpnyhvAmH
— Lokmat (@MiLOKMAT) June 10, 2021
गौरव भाटिया यांनी "मुकुल रॉय यांच्याबद्दल मी म्हणेन की येथेही फरक आपल्याला दिसून येतो. जेव्हा जितिन प्रसाद काँग्रेस सोडून जातात तेव्हा मध्यप्रदेशातली काँग्रेसची शाखा म्हणते की, तो कचरा होता, कचरापेटीत गेला. पण जेव्हा मुकुल रॉय सोडून गेले, तेव्हा आम्ही अशा प्रकारचं कोणतंही विधान केलं नाही" असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे युवा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद (Jitin Prasada) भाजपामध्ये (BJP) सामील झाले आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे नेते हरीश रावत (Harish Rawat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केजरीवाल यांच्या गुजरात भेटीदरम्यान हार्दिक पटेल यांची जोरदार चर्चा #Congress#HardikPatel#AAP#ArvindKejriwal#Politicshttps://t.co/X5QU3pzTwM
— Lokmat (@MiLOKMAT) June 15, 2021
"जितिन यांचा पक्षाला रामराम म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक"
"जितिन यांचा पक्षाला रामराम म्हणजे काँग्रेसच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक" असल्याचं हरीश रावत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांचा हा निर्णय न समजण्यासारख्या असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. "जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश करणे हे म्हणजे आमच्या तोंडावर मारलेली मोठी चपराक आहे. हे खूपच दु:खद आणि निराश करणारं आहे. त्यांनी काँग्रेसला स्थानिक पक्ष म्हटल्याने मला आश्चर्य वाटलं. तसेच त्यांच्या कुटुंबियांनी या पक्षाविरोधात संघर्ष केला त्यामध्येच त्यांनी प्रवेश केला हे गोंधळून टाकणारं आहे" असं हरीश रावत यांनी म्हटलं आहे. जितिन प्रसाद म्हणाले की, काँग्रेसमध्ये राहून जनतेच्या हिताचे रक्षण करणे शक्य नव्हते. आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कुशल आणि खंबीर नेतृत्वाची आणि भाजपसारख्या मोठ्या संघटनेची गरज आहे. भाजपच खऱ्या अर्थाने देशातील एकमेव राजकीय पक्ष होय. आजपासून माझ्या राजकीय जीवनाचा नवीन अध्याय सुरू होत आहे.
तृणमूल सोडून पक्षात आलेल्या नेत्याने भाजपाच्या पक्षांतर्गत कार्यपद्धतीवर व्यक्त केली तीव्र नाराजी #WestBengal#Politics#BJP#TMC#India#MamataBanerjeehttps://t.co/MeGt5qQ6cGpic.twitter.com/HlJKH4kKNS
— Lokmat (@MiLOKMAT) June 16, 2021