"आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय’’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 03:37 PM2021-06-09T15:37:15+5:302021-06-09T15:39:09+5:30

BJP Advice To Rahul Gandhi: जितिन प्रसाद यांच्या भाजपामधील प्रवेशानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपाकडून टोला लगावण्यात आला आहे.

BJP leader Nilesh Rane Says,"Now Rahul Gandhi himself should join the BJP, this is the last option for him." | "आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय’’ 

"आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय’’ 

Next
ठळक मुद्देराहुल गांधींच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेतमला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा राहुल गांधींचा स्वभाव काँग्रेसला घेऊन बुडाला आहे आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे

मुंबई - काही काळापर्यंत राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते जितिन प्रसाद यांनी आज दुपारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला काही महिने उरले असताना जितिन प्रसाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. दरम्यान, जितिन प्रसाद यांच्या भाजपामधील प्रवेशानंतर माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. (BJP leader Nilesh Rane Says,"Now Rahul Gandhi himself should join the BJP, this is the last option for him.")

जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर केलेल्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, राहुल गांधींच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे. मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन बुडाला आहे. आता राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा, हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे, असा टोला निलेश राणेंनी लगावला.  

दरम्यान, आज उत्तर प्रदेशमधील युवा नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. जितीन प्रसाद यांना गेल्या काही काळापासून काँग्रेसने पक्षातील केंद्रापासून काहीसे दूर केले होते. मात्र त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एक वर्षावर आली असताना पक्ष सोडून भाजपामध्ये जाणे पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

२००४ मध्ये जितीन प्रसाद यांनी शाहजहाँपूर येथून लोकसभेची निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला होता. दरम्यान यूपीओ-१ च्या काळात त्यांना मंत्री बनवण्यात आले होते. तेव्हा त्या सरकारमधील युवा मंत्र्यांपैकी ते एक होते.  २००९ मध्ये जितीन प्रसाद यांनी धौराहा लोकसभा मतदारसंघातून लढून विजय मिळवला होता. यूपीए-२ सरकारच्या काळात त्यांनी पेट्रोलियम, रस्ते वाहतूक यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती. मात्र २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात आलेल्या जबरदस्त मोदी लाटेत त्यांचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१७ मधील उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणुक आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. या पराभवांनंतर ते काँग्रेसच्या राजकारणातील मुख्य प्रवाहापासून काहीसे बाजूला फेकले गेले होते.  

Web Title: BJP leader Nilesh Rane Says,"Now Rahul Gandhi himself should join the BJP, this is the last option for him."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.