"राहुल गांधी विदेशी मानसिकतेचे, त्यांना भारतीय संस्कृतीचं ज्ञान नाही", भाजपाचं टीकास्त्र

By सायली शिर्के | Published: October 6, 2020 08:43 AM2020-10-06T08:43:46+5:302020-10-06T08:50:21+5:30

Bjp Surendra Singh And Rahul Gandhi : सुरेंद्र सिंह यांनी यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल विदेशी मानसिकतेचं असल्याचं  म्हटलं आहे.

bjp mla surendra singh suggests rahul gandhi to take tution from nationalists | "राहुल गांधी विदेशी मानसिकतेचे, त्यांना भारतीय संस्कृतीचं ज्ञान नाही", भाजपाचं टीकास्त्र

"राहुल गांधी विदेशी मानसिकतेचे, त्यांना भारतीय संस्कृतीचं ज्ञान नाही", भाजपाचं टीकास्त्र

Next

बलिया - वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय असलेले भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सुरेंद्र सिंह यांनी यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल विदेशी मानसिकतेचं असल्याचं  म्हटलं आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी लोकांकडून काही धडे घेतले पाहीजे असा सल्लाही सिंह यांनी दिला आहे. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक विधान काही दिवसांपूर्वी सुरेंद्र यांनी केलं आहे. त्यावरून काँग्रेसने भाजपावर टीकास्त्र सोडलं होतं. 

काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना सुरेंद्र सिंह यांनी "राहुल गांधी यांचे व्यक्तिमत्व हे दुटप्पी असून त्यांची मानसिकता विदेशी आहे. तसेच राहुल यांना भारतीय संस्कृतीबाबत काहीएक माहिती नाही. त्यांना भारतीय संस्कृतीच्या मूलभूत गोष्टींचे ज्ञान नाही. जर त्यांनी राष्ट्रवादी लोकांकडून काही धडे घेतले असते तर त्यांना राष्ट्रवादाची खरी व्याख्या समजली असती" असं म्हटलं आहे. हाथरसला जाताना त्यांचा दुटप्पी चेहरा समोर आल्याचं देखील सांगितलं आहे. 

"राहुल आणि प्रियंका गांधी हाथरसला जाताना हसत होते आणि पीडितेच्या घरी पोहोचल्यानंतर अश्रू वाहत होते"

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला जाताना रस्त्यात हसत हसत जात होते आणि पीडितेच्या घरी पोहोचल्यानंतर अश्रू वाहत होते असं सुरेंद्र सिंह म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील ते भाजपाचे आमदार असून त्यांनी अनेकदा मुक्ताफळं उधळली आहेत. मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक विधान केलं आहे हाथरस प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार", भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

"आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात. अशा घटनांना शासन आणि तलवारी रोखू शकत नाहीत" असं सुरेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. 

"या घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच रोखल्या जाऊ शकतात"

"मी आमदारासोबतच एक शिक्षकही आहे. या घटना केवळ चांगल्या संस्कारांनीच रोखल्या जाऊ शकतात. शासन आणि तलवार त्यांना रोखू शकत नाही. आपल्या मुलींवर संस्कार करणं हा सर्वांचा धर्म आहे. माझा धर्म आहे, सरकारचा धर्म आहे. कुटुंबाचाही हा धर्म आहे. जिथे सरकारचा धर्म संरक्षण करण्याचा आहे. तिथे मुलांना संस्कार देणं हा कुटुंबांचा धर्म आहे. सरकार आणि संस्कार मिळून देशाला सुंदर रुप देऊ शकतात. त्यासाठी दुसरं कोणीही समोर येणार नाही" असंही देखील भाजपाच्या आमदाराने म्हटलं आहे. 

Web Title: bjp mla surendra singh suggests rahul gandhi to take tution from nationalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.