Pegasus: “राहुल गांधींच्या मोबाइलमध्ये असं काय आहे की ते फॉरेंसिक चाचणीला घाबरतायत”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 09:13 PM2021-07-28T21:13:49+5:302021-07-28T21:15:30+5:30
Pegasus: काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला असून, राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून पेगॅससच्या माध्यमातून झालेल्या कथित हेरगिरीचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. पेगॅससवरून चर्चेची मागणी करत विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनेकदा तहकूब करण्यात आले. यानंतर आता विरोधकांनी संसदेबाहेर पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले. पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचे म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, राहुल गांधी यांच्या मोबाइलमध्ये असे काय आहे की ते फॉरेंसिक चाचणीला घाबरत आहेत, अशी विचारणा भाजपने केली आहे. (bjp sambit patra replied to rahul gandhi criticism over pegasus issue)
याला म्हणतात रिटर्न! TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीची कमाल; गुंतवणूकदारांचे केले १ लाखाचे ८७ लाख
संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. मोदी सरकारने पेगॅसस खरेदी केले की नाही आणि पेगॅसस हत्याराचा वापर आपल्याच लोकांविरुद्ध केला की नाही, या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या टीकेला भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी प्रत्युत्तर दिले असून, राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
मोदी सरकार देतेय १५ लाख कमावण्याची संधी; घरबसल्या करावं लागेल केवळ ‘हे’ काम
राहुल गांधींनी आपला मोबाइल तपासून घ्यावा
राहुल गांधींसह विरोधी पक्षातील सर्व नेते संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू देत नाहीत. संसदेत जनतेला कोरोनाच्या संसर्गावर चर्चा हवी आहे. मात्र, विरोधकांना ते नकोय, अशी टीका संबित पात्रा यांनी केली आहे. मोबाइलची हेरगिरी झाली असेल, तर या प्रकरणी राहुल गांधी यांनी पोलिसात जाऊन तक्रार केली पाहिजे. ते का आपल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी का करत नाहीत? त्यांच्या मोबाइलमध्ये असे काय आहे, ज्यामुळे ते तपासणीसाठी घाबरत आहेत?, अशी विचारणाही संबित पात्रा यांनी केली आहे.
भारत ‘रेड लिस्ट’ मध्ये! प्रवास केल्यास ३ वर्षांची बंदी; कायदेशीर कारवाईचाही इशारा
राहुल गांधींची हेरगिरी कोण कशाला करेल?
काँग्रेस मूळ मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधींची हेरगिरी कोण कशाला करेल? त्यांच्याकडून तर काँग्रेस पक्षही सांभाळला जात नाही, असा टोलाही पात्रा यांनी लगावला आहे. राहुल गांधी यांनी एकदा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हातातून ज्या प्रकारे कागदपत्रे फाडली होती, तसेच काहीसे त्यांच्या सहकाऱ्यांनी संसदेत केले, असा चिमटाही संबित पात्रा यांनी काढला.