“नेहरूंच्या ‘त्या’ भाषणामुळे अर्थव्यवस्था बिघडली अन् महागाई वाढली”; भाजप नेत्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 02:38 PM2021-08-02T14:38:28+5:302021-08-02T14:40:27+5:30

भाजपच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून, लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

bjp vishwas sarang claims inflation due to jawaharlal nehru speech on 15 august 1947 | “नेहरूंच्या ‘त्या’ भाषणामुळे अर्थव्यवस्था बिघडली अन् महागाई वाढली”; भाजप नेत्याचा अजब दावा

“नेहरूंच्या ‘त्या’ भाषणामुळे अर्थव्यवस्था बिघडली अन् महागाई वाढली”; भाजप नेत्याचा अजब दावा

Next
ठळक मुद्देदेशातील वाढत्या महागाईचे श्रेय नेहरू कुटुंबालाचकाँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले पाहिजेपंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेला बळकटी दिली

भोपाळ: इंधनदरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती आणि त्यामुळे झालेल्या महागाईविरोधातकाँग्रेससह अन्य विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसची महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांसह अन्य राज्यांमध्ये इंधनदरवाढ, महागाईविरोधात आंदोलने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील भाजप नेत्याने एक अजब दावा केला असून, देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी केलेल्या भाषणामुळे महागाई वाढल्याचे म्हटले आहे. (bjp vishwas sarang claims inflation due to jawaharlal nehru speech on 15 august 1947)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळामुळे १३३ कोटींचा चुराडा; केवळ १८ तास कामकाज!

काँग्रेसकडून वाढते इंधनदर आणि इतर मुद्द्यांवरुन आंदोलन करण्यासंबंधी विचारण्यात आले असता मध्य प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विश्वास सारंग यांनी महागाईचे खापर जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या भाषणावर फोडले असून, अजब दावा केल्याचे सांगितले जात आहे. महागाईची समस्या एका दिवसात उभी राहिलेली नाही. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन केलेल्या भाषणातील चुकांमुळेच अर्थव्यवस्था ढासळण्यास सुरुवात झाली, असा दावा सारंग यांनी यावेळी बोलताना केला. ते भोपाळमध्ये मीडियाशी बोलत होते.

“लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा का देत नाही”; हायकोर्टाचा ठाकरे सरकारला सवाल

वाढत्या महागाईचे श्रेय नेहरू कुटुंबालाच

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते नेहरु कुटुंब आहे. महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसात उभारला जात नाही. जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन भाषण देताना केलेल्या चुकांमुळेच देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे. नेहरुंनी आपली पाश्चिमात्य विचारसरणी लादली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संपवली, असा मोठा आरोप सारंग यांनी यावेळी केला. 

...तरच मागणी मान्य होऊ शकेल; मोदी सरकारने Tesla समोर ठेवली ‘ही’ अट!

पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेला बळकटी दिली

मोदी सरकारने गेल्या सात वर्षात अर्थव्यवस्था बळकट केली. भाजपच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून, लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे असा दावा करत वास्तविक पाहता काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले पाहिजे, असा खोचक टोला सारंग यांनी लगावला.
 

Web Title: bjp vishwas sarang claims inflation due to jawaharlal nehru speech on 15 august 1947

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.