काँग्रेसवर टीका करताना मायावतींचा भाजपाच्या सुरात सूर, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 05:37 PM2019-03-27T17:37:22+5:302019-03-27T17:37:58+5:30
बहुजन समाज पार्टी(BSP)च्या प्रमुख मायावतींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली- बहुजन समाज पार्टी(BSP)च्या प्रमुख मायावतींनीकाँग्रेसवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसवर टीका करत असताना त्यांनी भाजपाच्या सुरात सूर मिसळला आहे. 'न्याय' योजनेवरून मायावतींनी काँग्रेसवर टीका केली आहे. भाजपानं न्याय योजनेवरून भाजपानं काँग्रेसवर केलेली टीका योग्य असल्याचं मायावती म्हणाल्या आहेत. तसेत काँग्रेस आणि भाजपा या एकाच ताटाच्या दोन बाजू आहेत.
ट्विट करत त्या म्हणाल्या, सत्ताधारी भाजपाने काँग्रेस पक्ष गरिबी हटावचा देत असलेला नारा हे निवडणुकीतील फसवं आश्वासन आहे हे केलेलं विधान योग्य आहे. परंतु निवडणुकीत फसवी आश्वासनं देणं आणि लोकांची दिशाभूल फक्त भाजपानंच करावा, असा भाजपाला अधिकार मिळालेला आहे काय?, गरीब, मजूर, शेतकरी आदींच्या हक्कांची पायमल्ली करण्यात दोन्ही पक्ष एकाच ताटाच्या दोन बाजू आहेत.
सत्ताधरी बीजेपी का कांग्रेस पार्टी पर आरोप कि उसका गरीबी हटाओ-2 का नारा चुनावी धोखा है यह सच है परन्तु क्या चुनावी धोखा व वादाखिलाफी का अधिकार केवल बीजेपी के पास ही है?
— Mayawati (@Mayawati) March 27, 2019
गरीबों, मजदूरों, किसानों आदि के हितों की उपेक्षा के मामले में दोनों ही पार्टियाँ एक ही थाली के चट्टे-बट्टे हैं।
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांना दर वर्षी 72 हजारांची मदत देण्याची घोषणा राहुल गांधींनी सोमवारी (25 मार्च) केली. मात्र या योजनेची अंमलबजावणी अवघड असल्याचं मत काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. 'किमान उत्पन्न योजनेवर आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून काम करत होतो. जगातील अनेक प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी आम्ही यासाठी चर्चा केली.
यामध्ये आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचाही समावेश आहे,' असं राहुल गांधी म्हणाले. यासाठी एकूण 3.60 लाख कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. ही रक्कम देशाच्या एकूण जीडीपीच्या 1.7 टक्के असल्याचं राहुल यांनी सांगितलं. मात्र या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाणार, याची माहिती अद्याप काँग्रेसकडून देण्यात आलेली नाही.