"...असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही", शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 04:05 PM2020-08-24T16:05:43+5:302020-08-24T16:25:54+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
नवी दिल्ली - काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला सुरुवात होताच काँग्रेसमधील आपसातला वाद चव्हाट्यावर आला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी यांनी या बैठकीत ज्या काँग्रेस नेत्यांनी पक्षातील सुधारणेसाठी सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे, त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल या आरोपावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करत आक्षेप घेतला होता. यानंतर आता आरोपावरून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसच्या बैठकीत सुरू असलेल्या चर्चेवरून शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. '...असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही' असं म्हटलं आहे. "जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांनी आवाज उठवला, तेव्हा त्यांच्यावर भाजपाशी युती केल्याचा आरोप करण्यात आला. आता गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्यासारखे नेते पूर्णवेळ पक्षाध्यक्षपदाची मागणी करत आहेत, तर त्यांच्यावरही भाजपाशी युती केल्याचा आरोप करण्यात येत आहे. असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही" अशी टीका शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.
When Scindia ji raised his voice, he was accused of colluding with BJP. Now when leaders like Gulam Nabi Azad & Kapil Sibal are demanding full-time party chief, they're also being accused of colluding with BJP. No one can save such a party: Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan pic.twitter.com/1pS9EODYqX
— ANI (@ANI) August 24, 2020
भाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केल्याने काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते संतप्त झाले आहे. एकीकडे कपिल सिब्बल यांनी ट्विट करून राहुल गांधींच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली असतानाच गुलाम नबी आझाद यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे जर मी भाजपाशी कुठल्याही प्रकारची हात मिळवणी केल्याचे निष्पन्न झाले तर मी राजीनामा देईन, असे थेट आव्हानच गुलाम नवी आझाद यांनी दिले आहे. तसेच असे पत्र लिहिण्याचे कारण हे काँग्रेसची कार्यसमिती होती असंही त्यांनी सांगितलं.
'या' नेत्याने काँग्रेसला लगावला टोला https://t.co/p7HNNVIK0h#Congress#CongressPresident#priyankagandhi#RahulGandhi#SoniaGandhipic.twitter.com/m6qCiuaR6H
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2020
"काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार"
काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे भावी अध्यक्ष म्हणून थेट प्रियंका गांधी यांच्या मुलांच्या नावांचा दावेदारीसाठी विचार करता येईल असा सल्ला मिश्रा यांनी दिला आहे. तसेच ''काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार'' असं म्हणत नरोत्तम मिश्रा यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीसंदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार"
"मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय", Video शेअर करत मोदी झाले भावूक
कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचं मंगल करावं, शरद पवारांचं गणरायाला साकडं
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ...म्हणून 'या' देशात शवपेटीत झोपू लागलेत लोक