“उत्तर प्रदेशवासीयांची बदनामी थांबवा, सत्य बोला”; योगी आदित्यनाथांनी राहुल गांधींना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 10:41 PM2021-06-15T22:41:22+5:302021-06-15T22:43:37+5:30

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

cm yogi adityanath replied congress rahul gandhi over ghaziabad issue | “उत्तर प्रदेशवासीयांची बदनामी थांबवा, सत्य बोला”; योगी आदित्यनाथांनी राहुल गांधींना सुनावले

“उत्तर प्रदेशवासीयांची बदनामी थांबवा, सत्य बोला”; योगी आदित्यनाथांनी राहुल गांधींना सुनावले

Next
ठळक मुद्देयोगी आदित्यनाथांचा राहुल गांधींवर पलटवार

लखनऊ:उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. काही तरुणांनी एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना 'जय श्री राम' बोलण्याची सक्ती केल्याची माहिती मिळाली आहे. यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले असून, उत्तर प्रदेशमधील नागरिकांची बदनामी थांबवा, असे म्हटले आहे. (cm yogi adityanath replied congress rahul gandhi over ghaziabad issue)

निषेध करणं मूलभूत अधिकार, दहशतवादी कृत्य म्हणू शकत नाही; हायकोर्टाने केंद्राला सुनावले

गाझियाबादजवळील लोणी बॉर्डर परिसरात रिक्षामध्ये बसलेल्या वृद्ध व्यक्तीला जय श्री राम न बोलल्यामुळे मारहाण केल्याची घटना ५ जून रोजी घडली होती.  व्हायरल व्हिडिओत काही तरुणांनी वृद्ध मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली आहे. एका तरुणाने त्या वृद्ध माणसाची दाढी कात्रीने कापली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. यावरून राजकारण तापायला लागले असून, राहुल गांधींनी यावरून टीका केली होती. योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर पलटवार करत निशाणा साधला आहे. 

श्रीरामांचे खरे भक्त असं करु शकतात, हे मान्यच नाही; ‘त्या’ घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

श्रीरामांचा पहिला धडा म्हणजे सत्य बोला

प्रभू श्रीरामांचा पहिला धडा म्हणजे सत्य बोला, जे तुम्ही आयुष्यात कधीही केले नाहीत. पोलिसांनी खरी माहिती दिल्यानंतरही तुम्ही समाजात विष कालवत आहात, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सत्तेच्या लोभात माणुसकीचा अपमान होत आहे. उत्तर प्रदेशातील लोकांचा अपमान करणे आणि त्यांची बदनामी करणे थांबवा, असे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

काय म्हणाले होते राहुल गांधी?

मी हे मान्य करायला तयार नाही की, श्रीरामांचे खरे भक्त असे करु शकतात, अशी क्रौर्यता माणुसकीपासून दूर आहे आणि ती समाज आणि धर्म या दोघांसाठीही लाजिरवाणी आहे, असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यापूर्वी प्रभू श्रीराम हे स्वत: न्याय आहेत, सत्य आहेत, धर्म आहेत. त्यांच्या नावाने धोकेबाजी हा अधर्म आहे, असे राहुल गांधींनी म्हटले होते. 

“भाजप आणि RSS ने श्रीरामांच्या नावावर चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलाय”

दरम्यान, अब्दुल समद सैफी बुलंदशहर येथील रहिवासी असून लोणी येथे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अतुल कुमार सोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही माहिती मिळाली. ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सैफी यांना मारहाण करताना आणि दाढी कापण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमधील आरोपी गाझियाबाद येथील रहिवासी असून प्रवेश गुर्जर असं त्याचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. 
 

Web Title: cm yogi adityanath replied congress rahul gandhi over ghaziabad issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.