Satish Sharma: सतीश शर्मा: पायलट ते खासदार; संकटसमयी गांधी घराण्याचे 'गड' राखणारे शिलेदार!

By प्रविण मरगळे | Published: February 18, 2021 11:23 AM2021-02-18T11:23:38+5:302021-02-18T11:26:17+5:30

Veteran Congress leader Captain Satish Sharma dead: १९८० च्या दशकात कॅप्टन सतीश शर्मा यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राजकारणात आणलं होतं

Congress leader and Gandhi loyalist Capt Satish Sharma dies | Satish Sharma: सतीश शर्मा: पायलट ते खासदार; संकटसमयी गांधी घराण्याचे 'गड' राखणारे शिलेदार!

Satish Sharma: सतीश शर्मा: पायलट ते खासदार; संकटसमयी गांधी घराण्याचे 'गड' राखणारे शिलेदार!

Next
ठळक मुद्दे१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनलेराजीव गांधी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ अमेठी सांभाळण्याची जबाबदारी विश्वासू मित्र कॅप्टन सतीश शर्माकडे दिली१९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली त्यानंतर अमेठीत त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेसने कॅप्टन सतीश शर्मा यांना मैदानात उतरवलं

नवी दिल्ली – काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा(Congress Caption Satish Sharma) यांचं बुधवारी संध्याकाळी गोवा येथे निधन झालं, ७३ वर्षीय कॅप्टन शर्मा मागील काही काळापासून कॅन्सरने ग्रस्त होते, माजी पंतप्रधान राजीव गांधी(Rajiv Gandhi) यांचा सच्चा शिलेदार बनून अमेठी ते रायबरेलीपर्यंत गांधी कुटुंबासाठी नेहमी तत्पर असणारे सतीश शर्मा ३ वेळा लोकसभेत आणि ३ वेळा राज्यसभेचे सदस्य होते.

१९८० च्या दशकात कॅप्टन सतीश शर्मा यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राजकारणात आणलं होतं, तेव्हा ते इंडियन एअरलाईन्समध्ये पायलट होते, त्याचवेळी राजीव गांधी हेदेखील पायलट होते, विमान उड्डाणाच्यावेळी कॅप्टन सतीश शर्मा आणि राजीव गांधी यांच्यात घट्ट मैत्री झाली. भाऊ संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधी यांनी राजकारणात खऱ्या अर्थाने पाय रोवला. पण कॅप्टन शर्मा हे पायलट म्हणून नोकरी करत होते.

१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले, अशातच राजीव गांधी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ अमेठी सांभाळण्याची जबाबदारी विश्वासू मित्र कॅप्टन सतीश शर्माकडे दिली, तेव्हा कॅप्टन सतीश शर्मा यांनी नोकरीचा राजीनामा देत राजीव गांधी यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या कोअर टीममध्ये प्रमुख सदस्य बनले.

राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या मतदारसंघाची जबाबदारी कॅप्टन सतीश शर्मा यांच्यावर होती, अमेठीमधील विकास कामांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कॅप्टन सतीश शर्मा यांची महत्त्वाची भूमिका ठरली, ८० च्या दशकाअखेर अनेक सहकारी राजीव गांधी यांची साथ सोडून जनता दलात सहभागी झाले, वीपी सिंहपासून अरूण नेहरू पर्यंत अनेकांनी राजीव गांधींविरोधात मोर्चा उघडला. परंतु कॅप्टन सतीश शर्मा यांनी शेवटपर्यंत राजीव गांधी यांची साथ सोडली नाही.

१९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली त्यानंतर अमेठीत त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेसने कॅप्टन सतीश शर्मा यांना मैदानात उतरवलं, १९९१ मध्ये राजीव गांधी यांनी अमेठीतून निवडणूक जिंकली होती, परंतु निकाल येण्यापूर्वीच त्यांची हत्या झाली. त्यामुळे १९९१ मध्ये पुन्हा घेतलेल्या पोटनिवडणुकीत कॅप्टन शर्मा विक्रमी मताधिक्याने निवडून आले. तत्पूर्वी कॅप्टन शर्मा हे मध्यप्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून काम करत होते. ११ ऑक्टोबर १९४७ मध्ये सतीश शर्मा यांचा जन्म तेलंगणाच्या सिकंदराबाद येथे झाला होता. देहराडून येथून त्यांनी कर्नल ब्राऊन कँब्रिज स्कूलमध्ये शिक्षण घेतले. शर्मा रायबरेली आणि अमेठीमधून ३ वेळा लोकसभेत निवडून गेले होते, तर मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश येथून ३ वेळा राज्यसभेचे खासदार बनले होते.

पीवी नरसिम्हराव सरकारमध्ये सतीश शर्मा हे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री होते, मात्र १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. संजय सिंह यांनी सतीश शर्मा यांचा पराभव केला. त्यानंतर सोनिया गांधी(Sonia Gandhi) सक्रीय राजकारणात आल्यानंतर कॅप्टन शर्मा यांना १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीची लोकसभेची जागा सोडावी लागली. रायबरेली येथून त्यांना उमेदवारी मिळाली, काँग्रेसच्या सतीश शर्मांविरोधात भाजपाने अरूण नेहरू यांना मैदानात उतरवले, अरूण नेहरू हे राजीव गांधी यांचे नात्याने भाऊ लागत होते, परंतु दोन्ही जागेवर काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.

राहुल गांधी(Rahul Gandhi) जेव्हा पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढवत होते, तेव्हा त्यांच्या प्रचाराची धुरा कॅप्टन सतीश शर्मा सांभाळत होते, राहुल गांधी भाषण करताना सतीश शर्मा पाठीमागून त्यांना मार्गदर्शन करत होते, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासाठी राजकीय मैदान तयार करण्याचं काम अमेठी आणि रायबरेली इथं सतीश शर्मा यांनी केले.

 

Web Title: Congress leader and Gandhi loyalist Capt Satish Sharma dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.