Corona Vaccine: “त्यानंतरच ‘मन की बात’ करा”; राहुल गांधींची PM मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 12:08 PM2021-06-27T12:08:13+5:302021-06-27T12:09:21+5:30
Corona Vaccine: कोरोना लसीकरणावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा देशाला बसल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकारांनी तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. तसेच लसीकरणावरही अधिकाधिक भर दिला जात आहे. यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली असून, त्यानंतरच मन की बात करा, असे म्हटले आहे. (congress rahul gandhi criticises pm narendra modi over corona vaccination and mann ki baat)
गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधीकेंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने अनेकविध मुद्द्यांवरून जोरदार टीका करताना दिसत आहेत. कोरोनाची दुसरी लाट, कोरोना लसीकरण, महागाई, जीएसटी, इंधनदरवाढ यांसारख्या विविध विषयांवरून राहुल गांधी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम आणि कोरोना लसीकरणावरून राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.
PM मोदींच्या विरोधात टिप्पणी; योगी सरकारने केले महसूल अधिकाऱ्याला निलंबित
त्यानंतर मन की बात पण सांगा
फक्त प्रत्येक देशवासीयांपर्यंत लस पोहोचवा, मग हवे असल्यास मन की बात पण सांगा, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. यासह लसीकरणाबाबतचे तथ्य आणि सत्य दर्शवणारा एक ग्राफही शेअर केला आहे. याशिवाय #VaccinateIndia हा हॅशटॅगही दिला आहे.
बस हर देशवासी तक वैक्सीन पहुँचा दो,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 27, 2021
फिर चाहे मन की बात भी सुना दो!#VaccinateIndiapic.twitter.com/IIEgzyBK61
पंतप्रधान मोदींकडून आढावा बैठक
देशात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला करोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओ उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या लसींची उपलब्धता आणि येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह अनेक माहिती घेतली. लसीची संपूर्ण व्यवस्था हातात घेतल्यानंतर केंद्र सरकारला लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे. सरकारला यावर्षी डिसेंबरपर्यंत देशातील संपूर्ण लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे, असे यावेळी सांगितले गेल्याचे म्हटले जात आहे.