Pegasus: “पेगॅसस हेरगिरी म्हणजे देशद्रोह, गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 02:35 PM2021-07-23T14:35:27+5:302021-07-23T14:43:35+5:30

Pegasus: या प्रकरणाची आता न्यायालयीन चौकशी व्हावी, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

congress rahul gandhi demands amit shah should resign over using pegasus as political weapon | Pegasus: “पेगॅसस हेरगिरी म्हणजे देशद्रोह, गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा”

Pegasus: “पेगॅसस हेरगिरी म्हणजे देशद्रोह, गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा”

Next
ठळक मुद्देकेंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावापेगॅसस हेरगिरी प्रकरणी काँग्रेसची मागणी राहुल गांधींची ट्विटरवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. तसेच यावरून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. या प्रकरणाची आता न्यायालयीन चौकशी व्हावी, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. (congress rahul gandhi demands amit shah should resign over using pegasus as political weapon)

काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही महिन्यांपासून केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहे. आता देशभरात गाजत असलेल्या पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरूनही राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका करत अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. इस्रायलने दहशतवाद्यांविरूद्ध वापरण्यासाठी वर्गीकृत केलेले पेगॅसस हे एक शस्त्र आहे. मात्र, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्याविरूद्ध याचा वापर एक राजकीय शस्त्र म्हणून केला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

रेल्वेचे भन्नाट तंत्रज्ञान; फक्त ७ मिनिटांत स्वच्छ होणार संपूर्ण ट्रेन, हजारो लीटर पाणी वाचणार 

न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे

पेगॅसस हेरगिरी हे देशद्रोहाचे प्रकरण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे. यामुळे हा देशद्रोह नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून केला गेला, पंतप्रधान की गृहमंत्री, याची माहिती देशाला होईल, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

३०० भारतीय मोबाईल नंबर

काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आणि दोन मंत्र्यांची हेरगिरी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल या दोन केंद्रीय मंत्र्यांची नाव समोर आली आहेत. लीक झालेल्या डेटामध्ये ३०० भारतीय मोबाईल नंबर आहेत. त्यापैकी ४० मोबाईल नंबर हे भारतीय पत्रकारांचे आहेत. तसेच विरोधी पक्षातील ३ मोठे नेते, मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री, संरक्षण संस्थेतील प्रमुख अधिकारी आणि उद्योगपतींचा यात समावेश आहे. 

मस्तच! आता मुंबई, बंगळुरु, दिल्लीकडे रोजगार निर्मितीचे नेतृत्व; ‘या’क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये मोठी वाढ

दरम्यान, या मोबाईल नंबरवर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पाळत ठेवण्यात आली होती, असा खुलासाही यात करण्यात आला आहे. पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचाही फोन टॅप करण्यात आला आहे. प्रशांत किशोर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तेव्हा भाजपचे सरकार आले होते. त्यानंतर भाजपविरोधी पक्षांनी त्यांच्याशी संपर्क साधला. 

Web Title: congress rahul gandhi demands amit shah should resign over using pegasus as political weapon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.