"…हा गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय; लोकांचे जीव वाचवण्याकडे लक्ष द्या, नव्या घरासाठी आंधळा अहंकार नको"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 11:36 AM2021-05-07T11:36:49+5:302021-05-07T11:44:49+5:30
Congress Rahul Gandhi Slams Modi Government : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा भाग असलेल्या पंतप्रधान निवासस्थानाचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होईल. कोरोना महामारीच्या काळातच या प्रोजेक्टला पर्यावरण संबंधातील सर्व प्रकारची मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा (Central Vista Project) समावेश आवश्यक सेवांमध्ये केला आहे. लॉकडाऊन सारख्या निर्बंधांच्या काळातही हे काम थांबू नये, असा या मागचा उद्देश आहे. केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता या कामाला आणखी वेग येईल. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी यावरून मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे.
"सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे" असं म्हणत राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "सेंट्रल व्हिस्टा हा एक गुन्हेगारी स्वरुपातील अपव्यय आहे. लोकांचा जीव वाचवण्याकडे लक्ष द्या, नवं घर मिळवण्यासाठी आंधळा अहंकार नको" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी याआधीही मोदी सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी 10 डिसेंबरला या नव्या संसद भवनाचे भूमिपूजन केले होते. या प्रोजेक्ट अंतर्गत पुढील वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत ज्या इमारतींचे काम पूर्ण होणार आहे, त्यात पंतप्रधान निवासस्थानाचाही (Prime Minister's residence) समावेश आहे.
Central Vista is criminal wastage.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 7, 2021
Put people’s lives at the centre- not your blind arrogance to get a new house!
मोदी सरकारने पंतप्रधानांच्या नवीन घरासाठी 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी खर्च केले तर बरे होईल असं म्हणत प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच "देशातील लोक जेव्हा ऑक्सिजन, लस, रुग्णालयातील बेड, औषधे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशावेळी सरकारने पंतप्रधानांच्या नवीन घरासाठी 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी खर्च केले तर बरे होईल. अशा प्रकारच्या खर्चांमुळे अशा प्रकारच्या खर्चामुळे सरकारची प्राथमिकता ही अन्य गोष्टींसाठी आहे असा संदेश लोकांमध्ये जातो" असं प्रियंका यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"लोक ऑक्सिजन, लस, रुग्णालयातील बेड, औषधांसाठी प्रयत्न करताहेत अन् मोदी सरकार..."; प्रियंका गांधींचा हल्लाबोल #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#PriyankaGandhi#Congress#NarendraModihttps://t.co/IHsoo4NQhRpic.twitter.com/0iMvBL5owa
— Lokmat (@MiLOKMAT) May 4, 2021
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांनी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. यासोबतच मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "तुम्ही काहीच करू शकत नसाल तर खुर्ची रिकामी का नाही करत?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सीताराम येचुरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या एका ट्विटमध्ये येचुरी यांनी संसदेची नवीन इमारत बांधण्यासंदर्भातील खर्चाचा देखील उल्लेख केला आहे. "हे बांधकाम थांबवा आणि हा पैसा सर्व भारतीयांना मोफत ऑक्सिजन आणि लसी देण्यासाठी वापरा. ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही मोदींनी आपल्या अहंकारामुळे हे बांधकाम सुरू ठेवलं आहे आणि दुसरीकडे लोकं श्वास घेता येत नसल्याने मरत आहेत" असं येचुरी यांनी म्हटलं आहे.
"तुम्ही काहीच करू शकत नसाल तर खुर्ची रिकामी का नाही करत?", येचुरींचा हल्लाबोल#CoronavirusIndia#CoronavirusPandemic#sitaramyechury#modigovernment#NarendraModihttps://t.co/Z8IHcMkT44pic.twitter.com/Rtwh1XUYZ7
— Lokmat (@MiLOKMAT) May 7, 2021
उपराष्ट्रपतींचे निवासस्थानही पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल. या प्रोजेक्टसाठी जवळपास 13,450 कोटी रुपये लागणार आहेत. तसेच या कामासाठी जवळपास 46 हजार लोक लागतील अशी अपेक्षा आहे. यापार्श्वभूमीवर विरोधक सातत्याने या नव्या संसद भवनाच्या निर्माण कार्यावर प्रश्न उपस्थित करत आले आहेत. सोशल मिडियावरही लोग कोरोना काळात या इमारतीवर होत असलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. या लोकांचे म्हणणे आहे, की देशात रुग्णालय, ऑक्सिजन आणि औषधींचा तुटवडा जाणवत आहे. अशा काळात ऑक्सिजन, बेड तथा इतर आवश्यक गोष्टी जमविण्याऐवजी सरकार या प्रोजेक्टवर पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे.
विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; इंधन दरवाढीवरून काँग्रेसचा हल्लाबोल#Congress#RahulGandhi#modigovernment#PetrolDieselPriceHike#FuelPriceHikehttps://t.co/BE9LGtOsuppic.twitter.com/gh5Loy3EZU
— Lokmat (@MiLOKMAT) May 6, 2021