Corona Vaccination : "मंत्र्यांची संख्या वाढली पण कोरोना लसीची नाही"; राहुल गांधींचा मोदी सरकारला सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 08:19 AM2021-07-12T08:19:43+5:302021-07-12T08:30:14+5:30
Congress Rahul Gandhi Slams Modi Government : राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांवर पोहोचला आहे. काही राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात कोरोना लसीकरणही वेगाने सुरू आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. आता राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
"मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही" असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मंत्र्यांची संख्या वाढली आहे, कोरोना लसीची नाही!" असं म्हणत कोरोना लसी कुठं आहेत असा सवालही त्यांनी केला. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये एक फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये देशातील कोरोना लसीकरणासंदर्भातील आकडेवारी देण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी डिसेंबर 2021 पर्यंत देशात 60 टक्के लोकसंख्येला कोरोना लसीकरणाचे 2 डोस देणं आवश्यक आहे असं म्हटलं आहे.
मंत्रियों की संख्या बढ़ी है,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 11, 2021
वैक्सीन की नहीं!#WhereAreVaccinespic.twitter.com/gWjqHUVdVC
दररोज किमान 88 लाख जणांचं लसीकरण होणं आवश्यक आहे. मात्र मागील 7 दिवसांत दररोज सरासरी केवळ 34 लाख जणांनाच लसीकरण केलं जात आहे. दुसरीकडे गेल्या 7 दिवसांत दररोज सरासरी 54 लाख लसींचा तुटवडा आहे अशी माहिती राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये आहे. "केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही... शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार" असं म्हणत काही दिवसांपूर्वी राहुल यांनी टीकास्त्र सोडलं होतं. "केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगा लावणार. संपत्ती, आरोग्य आणि आपला जीव गमावणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार" असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
इंधन दरवाढीवरुन राहुल गांधींची मोदी सरकारवर बोचरी टीका#Congress#RahulGandhi#ModiGovernment#FuelPrice#PetrolPriceHike#DieselPricehttps://t.co/qjT5qUQtx8pic.twitter.com/S19rNSMyk8
— Lokmat (@MiLOKMAT) July 7, 2021
"तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं"; राहुल गांधींचा घणाघात
कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. याच दरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून जोरदार निशाणा साधला आहे. "तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं" अशा शब्दांत राहुल यांनी बोचरी टीका केली आहे.
CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोना रुग्णांना बेल्स पाल्सीचा सातपट धोका; 'या' लोकांसाठी ठरतोय जीवघेणा#coronavirus#CoronavirusPandemic#CoronaVirusUpdates#Corona#BellsPalsyhttps://t.co/7pDTTypAsF
— Lokmat (@MiLOKMAT) July 10, 2021