"देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती, कुठे आहे लस?"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 08:32 AM2021-07-26T08:32:25+5:302021-07-26T10:07:56+5:30
Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Corona Vaccination : राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाखांवर पोहोचला आहे. काही राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात कोरोना लसीकरणही वेगाने सुरू आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. आता राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना लसीकरणावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती" असं म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 'कुठे आहे लस?' असा हॅशटॅग वापरून मोदी सरकारला सवाल विचारला आहे. "देशवासियांची मन की बात ऐकली असती तर लसीकरणाची अशी स्थिती राहिली नसती" अशा शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच देशातील कोरोना लसीकरणाचा मंदावलेला वेग आणि मीडियातील बातमीचा उल्लेख करत एक व्हिडिओही राहुल यांनी शेअर केला. व्हिडिओमध्ये भारतातील लसीकरणाच्या आकड्यांवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. याचा उद्देश कोरोनाची तिसरी लाट रोखण्याचा आहे. डिसेंबर 2021 पर्यंत दोन्ही डोस देऊन 60 टक्के लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं लक्ष्य आहे असं म्हटलं आहे.
अगर समझते देश के मन की बात
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 25, 2021
ऐसे ना होते टीकाकरण के हालात।#WhereAreVaccinespic.twitter.com/aRXf3UhWWU
रोज 93 लाख नागरिकांचं लसीकरण करण्याची गरज आहे. पण गेल्या सात दिवसांचा लसीकरणाचा सरासरी आकडा हा दिवसाला 36 लाख इतका आहे. यामुळे गेल्या सात दिवसांत 56 लाख डोसचा फरक आहे. 24 जुलैला गेल्या 24 तासांत 23 लाख नागरिकांचे लसीकरण झाले. यात 69 लाखांचा फरक होता, असं व्हिडिओत म्हटलं आहे. काँग्रेसने मंदावलेली लसीकरण मोहीम आणि सरकारच्या लसीकरण धोरणावर जोरदार टीका केली आहे. तसेच पेगासस स्पायवेअर म्हणजे हेरगिरीवरून ही राहुल गांधींनी ट्वीट केलं आहे. "मित्रांचा फायदा आणि विरोधकांची हेरगिरी" असं देखील राहुल गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
#Pegasus
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 25, 2021
मित्रों का फ़ायदा
विरोधियों की जासूसी-
आम के आम गुठलियों के दाम!
कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये ब्रेन हॅमरेजसारख्या भयंकर आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्यविषयीच्या आणखी समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील एका रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमधून याबाबत दावा केला आहे. कोरोनातून ठीक झाल्यानंतर रुग्णांमध्ये न्यूरोल़ॉजिकल समस्यांचा अधिक घातक स्वरूपात वाढत असल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतील मूलचंद रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये ज्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्यात ब्रेन हॅमरेज आणि अनेक गंभीर समस्या वाढत आहेत. डॉक्टरांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. रुग्णालयातील सीनियर न्यूरोसर्जन डॉ. आशा बक्शी यांनी 37 टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखी सारखी लक्षणं दिसून येत आहेत. तर 26 टक्के रुग्णांमध्ये चव समजत नसल्याचं समोर आलं आहे.
CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! कोरोनावर मात केली पण आरोग्यविषयक समस्यांनी चिंता वाढवली#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/mHy87GLzNV
— Lokmat (@MiLOKMAT) July 25, 2021