"कोरोना मध्य प्रदेशचं काय बिघडवेल ज्याचे प्रदेशाध्यक्ष विष्णू आणि मुख्यमंत्री शिव आहेत" 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 11:46 AM2021-08-10T11:46:34+5:302021-08-10T11:49:47+5:30

Corona Virus Shivraj Singh Chouhan And BJP Tarun Chugh : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि प्रदेशाध्यक्ष विष्णु दत्त शर्मा यांच्याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे.

coronavirus can not harm madhya pradesh where shiv is cm and state president vishnu bjp-tarun chugh claims | "कोरोना मध्य प्रदेशचं काय बिघडवेल ज्याचे प्रदेशाध्यक्ष विष्णू आणि मुख्यमंत्री शिव आहेत" 

"कोरोना मध्य प्रदेशचं काय बिघडवेल ज्याचे प्रदेशाध्यक्ष विष्णू आणि मुख्यमंत्री शिव आहेत" 

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका नेत्याने अजब विधान केलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) आणि प्रदेशाध्यक्ष विष्णु दत्त शर्मा (Vishnu Dutt Sharma) यांच्याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. ज्याचे मुख्यमंत्री हे "शिव" आहेत त्यांचं कोरोना काय बिघडवेल? असं म्हटलं आहे. 

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ (Tarun Chugh) यांनी कोरोनाबाबत एक अजब विधान केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.  "कोरोना मध्य प्रदेशचं काय बिघडवेल ज्याचे प्रदेशाध्यक्ष विष्णू आणि मुख्यमंत्री शिव आहेत" असं तरुण चुघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलें आहे. भोपाळमधील एका कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली होती. तेव्हा असं म्हटलं आहे. तसेच या वर्षी डिसेंबरपर्यंत देशाच्या आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाच्या लसीचे 135 कोटी डोस पोहोचवले जातील असं देखील चुघ यांनी म्हटलं आहे. 

काँग्रेस प्रवक्ते भूपेंद्र गुप्ता यांनी यावरून जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते हे फक्त पक्षाच्या कार्यकर्त्याकडून कौतुक ऐकण्यासाठी अशी विधान करत असल्याचं म्हटलं आहे. गुप्ता यांनी यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान मध्य प्रदेशमध्ये 3.28 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जो सामान्य मृत्यू दरापेक्षा 54 टक्के अधिक होता. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्वतः कबुल केलं होतं की भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांच्या कुटुंबातील 3500 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता असा दावा केला आहे. 

मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 28,204 नवे रुग्ण; 147 दिवसांतील नीचांक

सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 147 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.  मंगळवारी (10 ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 28,204 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट हा 97.45 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 3,88,508 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Web Title: coronavirus can not harm madhya pradesh where shiv is cm and state president vishnu bjp-tarun chugh claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.