"मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील 'या' गिधाडांकडून शिकावं"; आरोग्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 02:43 PM2021-05-27T14:43:57+5:302021-05-27T14:46:27+5:30

Dr Harsh Vardhan Slams Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कोरोनासंदर्भातील आकडेवारीवरुन केलेल्या टीकेला आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जोरदार प्रत्यत्तर दिलं आहे. 

harshvardhan slams rahul gandhi for his tweet saidone should learn politics on corpses from vultures of earth | "मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील 'या' गिधाडांकडून शिकावं"; आरोग्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोला

"मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील 'या' गिधाडांकडून शिकावं"; आरोग्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोला

googlenewsNext

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत होती. परंतु आता कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. देशातील अनेक रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी रुग्णालयात बेडची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत वैद्यकीय सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे जीव गमावावा लागत आहे. य़ाच दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) हे विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर कोरोनासंदर्भातील आकडेवारीवरुन केलेल्या टीकेला आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जोरदार प्रत्यत्तर दिलं आहे. 

हर्षवर्धन यांनी राहुल गांधींचा दिल्लीपेक्षा न्यूयॉर्कवर अधिक विश्वास आहे असं म्हटलं आहे. तसेच "मृतांच्या नावाने राजकारण करणं काँग्रेसच्या या गिधाडांकडून शिकावं" असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधींनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "मृतांच्या नावाने राजकारण करणं ही काँग्रेसची स्टाईल आहे. झाडांवरील गिधाडं सध्या दिसेनासी झाली असली तर त्यांच्यातील ऊर्जा जमिनीवरील गिधाडांमध्ये आल्यासारखं वाटत आहे. राहुल गांधींचा दिल्लीपेक्षा न्यूयॉर्कवर जास्त विश्वास आहे. मृतांच्या नावाने राजकारण करणं हे जमिनीवरील 'या' गिधाडांकडून शिकावं" असं ट्विट हर्षवर्धन यांनी केलं आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून द न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राचा दाखला देत आकडे खोटं बोलत नाहीत पण भारत सरकार बोलतं असं म्हटलं होतं. या वृत्तपत्राने भारत सरकार सांगत असलेले कोरोनाचे आकडे आणि प्रत्यक्षातील आकड्यांमध्ये तफावत असल्याचा दावा केला होता. त्यावर आता हर्षवर्धन यांनी जोरदार उत्तर देत टोला लगावला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून "जबाबदार कोण?" असं म्हणत काही प्रश्न विचारले आहेत. "आता लसीवर फक्त मोदीजींचा फोटो आहे, उर्वरित जबाबदारी राज्यांवर टाकली गेली आहे. राज्यांचे मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे लसीच्या कमतरतेबद्दल माहिती पाठवत आहेत" अशी परिस्थिती असल्याचं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. 

"जबाबदार कोण?, मोदी सरकारने देशाला लस कमतरतेच्या दलदलीत ढकललं"; प्रियंका गांधींचा घणाघात

"आज, भारताच्या 130 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 11% लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि केवळ 3 % टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. मोदीजींच्या लस उत्सवाच्या घोषणेनंतर गेल्या एका महिन्यात लसीकरण 83% घटले. आज मोदी सरकारने देशाला लसीच्या कमतरतेच्या दलदलीत ढकलले आहे. सरकारचे अयशस्वी लस धोरण या लसीच्या कमतरतेमागे असल्याचे दिसून येते. याला जबाबदार कोण?" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. तसेच "कोरोनाच्या सुरुवातीपासूनच कोरोना लस सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याच्या साधनाऐवजी पंतप्रधानांच्या वैयक्तिक प्रसिद्धीचे साधन बनले. त्यामुळे जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आज इतर देशांच्या लसीच्या देणग्यांवर अवलंबून आहे. तेसच लसीकरणाच्या बाबतीत जगातील कमकुवत देशांच्या रांगेत सामील झाला आहे" असं देखील प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. 

Web Title: harshvardhan slams rahul gandhi for his tweet saidone should learn politics on corpses from vultures of earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.