अहमद पटेल यांच्यानंतर गांधी घराण्याला लाभला नवा संकटमोचक; राहुल गांधींना करणार मदत

By प्रविण मरगळे | Published: December 17, 2020 01:46 PM2020-12-17T13:46:40+5:302020-12-17T13:48:44+5:30

अलीकडेच कमलनाथ यांनी दिल्लीत येऊन सोनिया गांधींची भेट घेतली, त्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना भेटले

Kamal Nath Meets Congress President Sonia Gandhi To Discuss About New Party President Election | अहमद पटेल यांच्यानंतर गांधी घराण्याला लाभला नवा संकटमोचक; राहुल गांधींना करणार मदत

अहमद पटेल यांच्यानंतर गांधी घराण्याला लाभला नवा संकटमोचक; राहुल गांधींना करणार मदत

Next
ठळक मुद्देआतापर्यंत अध्यक्षपदावर गांधी घराण्याशिवाय अन्य व्यक्तीला बसवण्याचा हट्ट राहुल गांधींनी सोडला आहेकमलनाथ यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा केली आणि सर्व नेत्यांशी बोलून घेण्याचा सल्ला दिलासोनिया गांधी यांच्या नव्हे तर माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यशैली आणि कामाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत

नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीत खराब कामगिरीनंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले, त्यापाठोपाठ सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे संकटमोचक असलेले अहमद पटेल यांचं निधन झालं, त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर विश्वास टाकत त्यांना संकटमोचकाची भूमिका सोपवली आहे.

अलीकडेच कमलनाथ यांनी दिल्लीत येऊन सोनिया गांधींची भेट घेतली, त्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना भेटले, काँग्रेसचं नेतृत्व पुन्हा राहुल गांधी यांच्या हातात सोपवण्यासाठी कमलनाथ यांनी रस्ता तयार करावा अशी इच्छा सोनिया गांधी यांची आहे. आतापर्यंत अध्यक्षपदावर गांधी घराण्याशिवाय अन्य व्यक्तीला बसवण्याचा हट्ट राहुल गांधींनी सोडला आहे आता ते पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहेत. तर दुसरीकडे सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांसह अन्य ज्येष्ठ नेते ज्यांनी पत्रावर सही केली नव्हती तेदेखील आता पार्टीच्या भवितव्याची चिंता करत आहेत.

याचीच माहिती घेऊन कमलनाथ यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा केली आणि सर्व नेत्यांशी बोलून घेण्याचा सल्ला दिला. यावेळी सोनिया गांधी यांनी कमलनाथ यांना जबाबदारी दिली, कोणत्याही प्रकारे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना समजावून पुढील काँग्रेस कार्यकारणीच्या समितीत काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावावर सहमती बनवावी, कमलनाथ यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर पक्षातील काही अन्य नेत्यांशीही चर्चा केली.

परंतु काँग्रेसमध्ये अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नव्हे तर माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यशैली आणि कामाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जे लोक प्रश्न उपस्थित करत आहेत ते काँग्रेसचे विश्वसनीय चेहरे आहेत. ज्यांनी यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या सरकार आणि पक्षाच्या निर्णयावरही प्रभाव टाकला आहे. कॉंग्रेसच्या संभाव्य संघटना निवडणुकीत लवकरच अध्यक्षांवर सहमती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे, पण सोनिया गांधी आणि त्यांच्या निष्ठावंतांना वाटतेय की, ही सहमती राहुल गांधी यांच्या नावावर अशाप्रकारे बनावी जशी सोनिया गांधी यांच्यावर नावावर होते. पण बरेच वरिष्ठ नेते राहुल यांच्या नावावर शंका उपस्थित करत आहेत, त्यामुळे सोनिया गांधी यांची डोकेदुखी वाढली आहे.

सोनिया गांधींवरील संकट अधिकच वाढले आहे कारण गेल्या वीस वर्षांपासून सोनिया यांच्यासाठी संकटमोचक म्हणून काम करणारे अहमद पटेल आता या जगात नाहीत आणि सध्या गांधी कुटुंबाला कोणताही ठोस नेता सापडत नाही जो राहुल गांधी यांच्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू शकेल. म्हणूनच सोनिया गांधींनी जुन्या निष्ठावंत आणि कुटुंबातील ज्येष्ठ नेते कमलनाथवर विश्वास ठेवला आहे.

नाव न छापण्याच्या अटीवर, कॉंग्रेसच्या एका स्पष्ट बोलणाऱ्या नेत्याने सांगितले की, अंतर्गत असंतोष इतका वाढला आहे की निवडणुकीत कोणीही राहुल यांच्याविरूद्ध उभे राहू शकते आणि राहुल गांधींनी कोणालाही उभे करण्याचा प्रयत्न केला तर पक्ष फुटू शकतो त्यामुळे सोनिया गांधींनी कमलनाथ यांना पुढे केले आहे. दुसरीकडे आणखी एक दिग्गज नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींचे उघडपणे समर्थन केले आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाध्यक्ष व्हावे अशी आपली इच्छा असल्याचे दिग्विजय यांनी खुले विधान केले. दिग्विजय यांचे निकटचे सूत्र असेही म्हणतात की, राजा साहेब हे उघडपणे राहुल गांधींच्या पाठीशी आहेत, पण राहुलच्या जागी दुसरे कोणी बनवल्याची चर्चा असेल तर तेही आपला दावा मांडू शकतात आणि जर निवडणूक झाली तर ते निवडणूकही लढवतील, ते फक्त राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्यासमोर आपला दावा मांडणार नाही.

तर २३ जणांच्या गटाच्या वतीने अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या नावावर सहमती नाही. या गटाचे बरेच नेते राहुल यांच्या कामावर समाधानी नाहीत. परंतु त्यांनी अद्याप कोणतेही पर्यायी नाव पुढे केले नाही. परंतु माजी केंद्रीय मंत्री आणि २३ जणांच्या गटाचे वरिष्ठ सदस्य आनंद शर्मा यांचे नावही अध्यक्षपदासाठी चालवले जात आहे. दहा जनपथ कुटुंब, निष्ठावंत आणि २३ जणांचा गट यांच्यात कमलनाथ स्वत: ला तटस्थ असल्याचे दर्शवून दोन्ही बाजूंची सहमती बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

Web Title: Kamal Nath Meets Congress President Sonia Gandhi To Discuss About New Party President Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.