Congress: काँग्रेसमध्ये दोन युवा नेते करणार प्रवेश; लवकरच होणार अधिकृत घोषणा, सूत्रांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 04:06 PM2021-09-25T16:06:25+5:302021-09-25T16:09:23+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून हे दोन्ही युवा नेते काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.

Kanhaiya Kumar and RDAM MLA Jignesh Mewani from Gujarat to join Congress on September 28: Sources | Congress: काँग्रेसमध्ये दोन युवा नेते करणार प्रवेश; लवकरच होणार अधिकृत घोषणा, सूत्रांची माहिती

Congress: काँग्रेसमध्ये दोन युवा नेते करणार प्रवेश; लवकरच होणार अधिकृत घोषणा, सूत्रांची माहिती

Next

नवी दिल्ली – सीपीआय नेते कन्हैया कुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी येत्या २८ सप्टेंबरला काँग्रेसमध्ये सहभागी होतील. काँग्रेसनं कन्हैया कुमारला बिहार विधानसभा निवडणुकीवेळी पक्षात येण्याची ऑफर दिली होती. परंतु त्यावेळी ते शक्य झालं नाही. अलीकडेच कन्हैया कुमारनं राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर आता कन्हैया कुमार(Kanhaiya Kumar) अधिकृतपणे काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. बिहारमध्ये काँग्रेस पक्षसंघटनेत बदल करणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून हे दोन्ही युवा नेते काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. कन्हैया कुमारसह जिग्नेश मेवाणीही(Jignesh Mewani) काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहे. गुजरातमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत उत्तरी गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघात उमेदवार न उतरवून काँग्रेसनं जिग्नेशची मदत केली होती. काँग्रेस सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे बिहारच्या राजकीय मैदानात कन्हैया कुमारचं विशेष महत्त्व आहे. काँग्रेसनं बिहारमध्ये सहकारी पक्ष राजद आणि सीपीआयपेक्षाही खराब कामगिरी केली होती. काँग्रेसनं ७० जागांपैकी अवघ्या १९ जागांवर विजय मिळवला होता. तर राजदनं १४४ पैकी निम्म्यापेक्षा जास्त आणि सीपीआयनं १९ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या.

कन्हैया आणि जिग्नेश यांच्या पक्षप्रवेशानं काँग्रेस मिळणार ताकद  

मागील २ वर्षात काँग्रेसच्या युवा नेत्यांनी पक्षाची साथ सोडत इतर पक्षात सहभागी झाले. त्यात ज्योतिरादित्य शिंदे, सुष्मिता देव, जितीन प्रसाद, प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाचा समावेश आहे. कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी जर काँग्रेसमध्ये सहभागी होणार असतील तर त्याने पक्षाला उत्तर भारताच्या राजकारणात ताकद मिळण्याची शक्यता आहे. कारण सपा-बसपा यांनी स्पष्ट केले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेससोबत हात मिळवणी करणार नाहीत. पक्ष स्वत:च्या बळावर निवडणूक उतरेल. त्यामुळे कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांची काँग्रेसला गरज भासत आहे. मुळचा बिहारमधील असलेला कन्हैया कुमार जेएनयूमध्ये झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीमुळे चर्चेत आला होता. त्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय येथून भाजपा नेते गिरिराज सिंह यांना आव्हान दिले होते. मात्र तिथे त्याचा दारुण पराभव झाला होता. दुसरीकडे मागासवर्गीयांचे राजकारण करणाऱ्या जिग्नेश मेवानीने २०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुजरातमधील वडगाम विधानसभा मतदारसंघामधून विजय मिळवला होता.

Web Title: Kanhaiya Kumar and RDAM MLA Jignesh Mewani from Gujarat to join Congress on September 28: Sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.