"कृषी कायदे हटवण्यासाठी आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 04:17 PM2020-12-12T16:17:01+5:302020-12-12T16:35:25+5:30

Rahul Gandhi And Farmers Protest : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे

kisan anodlan rahul gandhi asked how much more will have to be sacrificed | "कृषी कायदे हटवण्यासाठी आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल"

"कृषी कायदे हटवण्यासाठी आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल"

Next

नवी दिल्ली - दिल्ली सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनावरून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. "आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल" असा संतप्त सवाल करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "कृषी कायदे हटवण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आणखी किती बलिदान द्यावं लागेल?" असा प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 11 शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये एका बातमीचा फोटोही शेअर केला आहे. यामध्ये तन्ना सिंह, जनकराज, गजन सिंह, गुरजंट सिंह, लखबीर सिंह, सुरेंद्र सिंह, मेवा सिंह, राममेहर, अजय कुमार, किताब सिंह आणि कृष्ण लाल गुप्ता यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

केंद्र सरकारने गैरसमजात राहू नये, असा इशारा राहुल गांधी यांनी याआधी दिला आहे. सरकार शेतकऱ्यांची शक्ती कमी समजत आहे. ते म्हणाले, जोपर्यंत सरकार तिन्ही कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सीताराम येचुरी, डी.  राजा आणि टी. के. एस.  एलोंगोवान यांच्यासोबत बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर गांधी बोलत होते.

कडक सॅल्यूट! सिंघू बॉर्डरवर कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना 'ही' व्यक्ती वाटते मोफत स्वेटर

सिंघू बॉर्डरवर शकील मोहम्मद कुरेशी कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति असलेला आदर व्यक्त करत आहेत. कुरेशी शेतकऱ्यांना मोफत स्वेटर वाटत आहेत. दररोज सकाळी आठ वाजता कुरेशी रस्त्याच्या कडेला आपला स्टॉल लावतात आणि स्थानिक ठिकाणी तयार केलेले स्वेटर नव्या केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली-हरयाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते मोफत वाटत आहेत. कुरेशी यांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत 300 जॅकेट्स आणि स्वेटरचं वाटप केलं आहे. कुरेशी हे गरम कपडे विकण्याचे काम करतात. ते दररोज 2500 रुपयांची कमाई करतात. 

Web Title: kisan anodlan rahul gandhi asked how much more will have to be sacrificed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.