“...म्हणूनच भाजप राहुल गांधींना घाबरते”; काँग्रेसची PM मोदींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 03:17 PM2021-08-07T15:17:01+5:302021-08-07T15:19:47+5:30
महाराष्ट्र काँग्रेसने एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडले आहे.
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून काँग्रेसकडून मोदी सरकार आणि भाजपवर (BJP) निशाणा साधला जात आहे. महागाई, इंधनदरवाढ, पेगॅसस हेरगिरी, कोरोनाची परिस्थिती, कोरोना लसीकरण यांसारख्या विषयांवरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) जवळपास दररोज केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) माध्यामांसमोर येत नाहीत. कारण ते पत्रकार परिषद घ्यायला घाबरतात, अशी टीका यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमी महाराष्ट्र काँग्रेसने एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडले आहे. (maharashtra pradesh criticised pm narendra modi over not taking press conference)
“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल...”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलेले एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून, याबाबत जोरदार चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेसने दोन फोटो ट्विट केले असून, पहिल्या फोटोमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी पहिला फोटो राहुल गांधी पत्रकार परिषदेमध्ये असे म्हटले असून, दुसऱ्या फोटोला कॅप्शन देताना नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेमध्ये, असे म्हटले आहे. मात्र, दुसऱ्या फोटोत काहीच दिसत नसून, केवळ ब्लॅक आऊट झालेला काळा आयताकृती फोटो पोस्ट करण्यात आला आहे. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी पत्रकार परिषदेमध्ये आलेच नाहीत, अशी अप्रत्यक्ष टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
(Pic-1) Shri. @RahulGandhi in a Press Conference
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 7, 2021
(Pic-2) Shri Narendra Modi in a Press Conference
Here's why #BJPFearsRahulGandhipic.twitter.com/seglmchyBy
म्हणूनच भाजप राहुल गांधींना घाबरते
महाराष्ट्र काँग्रेसने हे ट्विट करताना #BJPFearsRahulGandhi असा हॅशटॅग वापरला आहे. पत्रकार परिषदेतील राहुल गांधी आणि कधीही पत्रकार परिषद न घेणारे मोदी अशी तुलना करत काँग्रेसने, ...म्हणूनच भाजपा राहुल गांधींना घाबरते, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून, केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि RSS वर निशाणा साधण्यात आला आहे.
“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आलात, तेव्हा काही बोललो का? आम्ही आमचं बघू”
दरम्यान, राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय, अशी विचारणा करत केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हीन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते. केंद्रातील भाजप सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.