"मोदी सरकारसाठी विद्यार्थी देशद्रोही, शेतकरी खलिस्तानी; भांडवलदार मात्र पक्के मित्र"; राहुल गांधींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 11:47 AM2020-12-16T11:47:30+5:302020-12-16T11:50:20+5:30
Rahul Gandhi And Farmers Protest : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनावरून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारसाठी आंदोलन करणारे शेतकरी खलिस्तानी आहेत मात्र 'क्रोनी कॅपिटलिस्ट' (भांडवलदार) मात्र त्यांचे पक्के मित्र आहेत, असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मोदी सरकारसाठी विरोध करणारे विद्यार्थी देशद्रोही आहेत. चिंता व्यक्त करणारे नागरिक शहरी नक्षलवादी आहेत. प्रवासी मजूर कोरोनाचे प्रसारक आहेत. बलात्कार पीडित त्यांच्यासाठी काहीही नाहीत. आंदोलन करणारे शेतकरी खलिस्तानी आहेत आणि भांडवलदार मात्र पक्के मित्र आहेत" असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. याआधीही त्यांनी अनेकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
For Modi Govt:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 15, 2020
Dissenting students are anti-nationals.
Concerned citizens are urban naxals.
Migrant labourers are Covid carriers.
Rape victims are nobody.
Protesting farmers are Khalistani.
And
Crony capitalists are best friends.
"कृषी कायदे हटवण्यासाठी आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल"
"कृषी कायदे हटवण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आणखी किती बलिदान द्यावं लागेल?" असा प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 11 शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये एका बातमीचा फोटोही शेअर केला आहे. यामध्ये तन्ना सिंह, जनकराज, गजन सिंह, गुरजंट सिंह, लखबीर सिंह, सुरेंद्र सिंह, मेवा सिंह, राममेहर, अजय कुमार, किताब सिंह आणि कृष्ण लाल गुप्ता यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.
Farmers Protest : "17 दिवसांमध्ये 11 शेतकरी बांधवांच्या बलिदानानंतरही निरंकुश मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटलेला नाही"https://t.co/VmsaF5Vx8V#Congress#FarmerProtest#FarmBills2020#RahulGandhi#ModiGovernmentpic.twitter.com/OsPZWkqCNE
— Lokmat (@MiLOKMAT) December 12, 2020
केंद्र सरकारने गैरसमजात राहू नये, असा इशारा राहुल गांधी यांनी याआधी दिला आहे. सरकार शेतकऱ्यांची शक्ती कमी समजत आहे. ते म्हणाले, जोपर्यंत सरकार तिन्ही कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सीताराम येचुरी, डी. राजा आणि टी. के. एस. एलोंगोवान यांच्यासोबत बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर गांधी बोलत होते.
Farmers Protest : कृषी कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान 11 शेतकऱ्यांनी गमावला जीव, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोलhttps://t.co/VNLoErLpsh#RahulGandhi#Congress#FarmersProtests#FarmBills2020pic.twitter.com/79oAKoTmso
— Lokmat (@MiLOKMAT) December 12, 2020
Farmers Protest : कौतुकास्पद! शेतकऱ्यांना आतापर्यंत 300 जॅकेट्स आणि स्वेटरचं केलं वाटप https://t.co/ya9bGSiNd9#FarmersProtest#FarmBills2020#FarmLaws
— Lokmat (@MiLOKMAT) December 12, 2020