“सरकार सगळं वाचतंय; Pegasus राजकारण्यांपर्यंत मर्यादित नाही, ते तुमच्याबद्दलही आहे”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 01:55 PM2021-07-31T13:55:01+5:302021-07-31T13:57:24+5:30
Pegasus: देशभरातील काही राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस तंत्रज्ञानाचा वापर करून हॅक करण्यात आल्याचे उघड झाले.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पेगॅसस हेरगिरी प्रकरण चांगलेच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. इंधनदरवाढ, महागाई, बेरोजगारी, कोरोना परिस्थिती लसीकरण यामध्ये आता पॅगेसस हेरगिरी प्रकरणाची भर पडली असून, विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. संसदेतही या प्रकरणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकदा कामकाज तहकूब करावे लागले आहे. यातच आता राष्ट्रवादीकडूनही याच मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली असून, विचार करण्याचा सल्ला सामान्य नागरिकांना दिल्याचे म्हटले जात आहे. (ncp jitendra awhad criticized centre modi govt over pegasus snoopgate issue)
PM मोदी आणि अमित शहांविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका; नेमकं प्रकरण जाणून घ्या
इस्त्रायलमधील एनएसओ गटाने तयार केलेल्या Pegasus Spyware वरून भारतात बराच गदारोळ सुरू आहे. देशभरातील काही राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस तंत्रज्ञानाचा वापर करून हॅक करण्यात आल्याचे उघड झाले. तसेच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांझी यांचा फोनही या तंत्रज्ञानाचा वापर करून हॅक करण्यात आल्याचे समोर आले. यानंतर विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, सर्वसामान्य नागरिकांना सल्ला दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.
“GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील”
ते राजकारण्यांपर्यंत मर्यादित नाही, तुमच्याबद्दलही आहे
सरकार तुमचे WhatsApp चॅट, SMS वाचतेय. तुमचे व्हिडिओ आणि फोटो, इमेल, मेडिकल रेकॉर्ड, पेमेंट हिस्ट्री, संपर्क क्रमांक पाहातेय.Pegasus Snoopgate केवळ राजकारणी, पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतच मर्यादित नाही. ते तुमच्याबद्दलही आहे. विचार करा, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना सूचक इशाराही दिला आहे.
The government is reading your :
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 31, 2021
SMS
Seeing your videos and pictures
Medical records
Your payment history
Contacts #PegasusSnoopgate is not just about politicians, journalists and activists, it’s about you.
Think.
मोदी सरकारने पेगॅसस खरेदी केले की नाही
संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. मोदी सरकारने पेगॅसस खरेदी केले की नाही आणि पेगॅसस हत्याराचा वापर आपल्याच लोकांविरुद्ध केला की नाही, या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले असून, राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
आता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती!
राहुल गांधींनी आपला मोबाइल तपासून घ्यावा
मोबाइलची हेरगिरी झाली असेल, तर या प्रकरणी राहुल गांधी यांनी पोलिसात जाऊन तक्रार केली पाहिजे. ते का आपल्या फोनची फॉरेन्सिक तपासणी का करत नाहीत? त्यांच्या मोबाइलमध्ये असे काय आहे, ज्यामुळे ते तपासणीसाठी घाबरत आहेत?, अशी विचारणाही संबित पात्रा यांनी केली आहे. राहुल गांधींची हेरगिरी कोण कशाला करेल? त्यांच्याकडून तर काँग्रेस पक्षही सांभाळला जात नाही, असा टोलाही पात्रा यांनी लगावला आहे.