“नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, मुंबई-पुणे हायवेची विक्री कोणी केली, याचा आधी जबाब द्या”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 11:28 PM2021-08-25T23:28:53+5:302021-08-25T23:30:51+5:30
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर देत, तुम्हाला मुद्रीकरण म्हणजे का हे माहिती आहे का, असा खोचक सवाल केला.
नवी दिल्ली: केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील सरकारी संपत्ती खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन असे या उपक्रमाला नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत रेल्वे, ऊर्जा ते रस्त्यापर्यंत अनेक मूलभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रातील सरकारी संपत्तीचे मॉनेटायझेशन केले जाणार आहे. यावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर देत, तुम्हाला मुद्रीकरण म्हणजे का हे माहिती आहे का, असा खोचक सवाल केला. (nirmala sitaraman replied rahul gandhi over criticism on national monetization pipeline)
मोदी सरकारकडून आता कोकण रेल्वेचे खासगीकरण? ७२८१ कोटींचा निधी उभारणार
नॅशनल मोनेटाइजेशन पाईपलाईन उपक्रमावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 70 वर्षात जनतेच्या पैशाने बनवलेली देशाची संपत्ती त्यांच्या काही उद्योगपती मित्रांना विकत आहेत, असा आरोप केला होता. याला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर देत, त्यांना मोनेटायझेशन म्हणजे काय, याची माहिती आहे का, असा बोचरा सवाल केला आहे. सीतारमण यांनी सार्वजनिक बँकाच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
“ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का”; भाजपची टीका
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनची विक्री कोणी केली
मुंबई-पुणे महामार्ग कोणी विकला, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनची विक्री कोणी केली याचे आधी उत्तर द्या, असे सांगत मुंबई-पुणे हायवेची खासगी क्षेत्राला जवळपास ८००० कोटींना विक्री कोणत्या सरकारने केली. २००८ मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशनचे खासगीकरण झाले. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या विक्रीचा प्रस्ताव कोणत्या सरकारने मागवले होते. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आता भावोजीची मालकी आहे ना, असा थेट प्रश्न करत सीतारमण यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
मोदी सरकारचा मोठा निर्णय! रोजगाराला चालना मिळणार; १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी
सामन्यांची दिशाभूल करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
मागील ७० वर्षात देशात जे उभे राहिले, त्याचे कॉमनवेल्थ खेळांच्या वेळी काय झाले. संपत्ती निर्माण करताना तयार झालेली मलाई कोणी खाल्ली. कॉंग्रेसने सत्तेच्या काळात रस्ते, रेल्वे, बंदरे, खाणी यांची विक्री केली आणि पैसा बनवला. याचा आधी त्यांनी जबाब द्यावा आणि मग मोदी सरकारवर टीका करावी, असा घणाघात सीतारामन यांनी केला. सामन्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. त्याला जनता भुलणार नाही. केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी अभ्यास करावा, असा सल्लाही सीतारामन यांनी यावेळी बोलताना दिला.