केवळ राहुल गांधीच काँग्रेसचे नेतृत्व करू शकतात : बघेल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 11:33 PM2021-02-07T23:33:42+5:302021-02-07T23:34:08+5:30
एका आठवड्याच्या आत काँग्रेसच्या दोन राज्य (दिल्ली काँग्रेस आणि छत्तीसगड प्रदेश काँग्रेस समिती) शाखांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद दिले जावे असे ठराव संमत केले आहेत. बघेल यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद दिले जावे असा प्रस्ताव मांडला होता.
नवी दिल्ली : राहुल गांधी हे सरकारच्या दबाबाला बळी न पडता महत्त्वाच्या मुद्द्यांवर कणखर भूमिका घेत असल्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तेच एकटे घेऊ शकतात, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले. राहुल गांधी यांच्याकडेच अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जावी, अशी पक्षात वाढती मागणी होत असताना बघेल यांनीही त्या मागणीला पाठिंबा दिला.
एका आठवड्याच्या आत काँग्रेसच्या दोन राज्य (दिल्ली काँग्रेस आणि छत्तीसगड प्रदेश काँग्रेस समिती) शाखांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद दिले जावे असे ठराव संमत केले आहेत. बघेल यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपद दिले जावे असा प्रस्ताव मांडला होता. छत्तीसगड प्रदेश काँग्रेस समितीने संमत केलेल्या ठरावात म्हटले आहे की, “सर्व काँग्रेसजण हे राहुल गांधी यांच्यासोबत खंबीरपणे असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटना सातत्याने बळकट होईल, असा त्यांचा विश्वास आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास चेतवला गेला आहे. पक्षाचा पाया त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनात बळकट केला जाईल.