राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा लवकरच काँग्रेस प्रवेश?, राहुल गांधींच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 02:10 PM2021-07-14T14:10:07+5:302021-07-14T14:10:41+5:30

Prashant Kishor To Join Congress: राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Prashant Kishor To Join Congress Big Hint After Meeting With Gandhis | राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा लवकरच काँग्रेस प्रवेश?, राहुल गांधींच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा लवकरच काँग्रेस प्रवेश?, राहुल गांधींच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

Next

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नुकतंच प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेनं जोर धरला आहे. (Prashant Kishor To Join Congress? Big Hint After Meeting With Gandhis)

शरद पवारांच्या भेटीनंतर निवडणूक चाणक्य राहुल गांधीच्या भेटीला; पुढच्या वर्षी धमाका करणार?

२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला तोडीसतोड आव्हान देण्यासाठी आणि देशातील प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबतच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबतचं वृत्त 'एनडीटीव्ही' वृत्तवाहिनीनं दिलं आहे. 

Sharad Pawar: शरद पवार राष्ट्रपती निवडणूक लढविणार? प्रशांत किशोरांच्या दिल्लीभेटीनंतर चर्चांना उधाण

प्रशांत किशोर यांनी मंगळवारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी चर्चेत प्रियांका आणि सोनिया गांधी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अशी चर्चा काही पहिल्यांदाच झालेली नाही असंही सांगण्यात येत आहे. 

नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार योग्य, काँग्रेस अनेक राज्यांत इतिहासजमा; संजय राऊतांचे वक्तव्य

प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबियांमध्ये झालेली बैठक आगामी पंजाब किंवा उत्तर प्रदेश विधानसभेच्या मुद्द्यावरुन नसून त्याहूनही मोठी चर्चा या बैठकीत झाल्याचं सांगण्यात येत आहे. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांना काँग्रेसकडून मोठी भूमिका दिली जाण्याची शक्यता असल्याची चिन्हं आहेत. 

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवेळी रणनितीकार म्हणून यापुढे काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. "मी आता जे करतोय ते यापुढे कायम ठेवण्याची माझी इच्छा नाही. मी या क्षेत्रात बरंच काम केलं. आता थांबण्याची गरज आहे आणि आता जीवनात काहीतरी वेगळं करण्याची वेळ आली आहे", असं प्रशांत किशोर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. 

प्रशांत किशोर आणि राहुल गांधी यांची भेट २०१७ साली उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी झाली होती. पण त्यावेळी किशोर यांच्या रणनितीला यश आलं नव्हतं. काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. 

Web Title: Prashant Kishor To Join Congress Big Hint After Meeting With Gandhis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.