“मीदेखील काश्मिरी पंडित; जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळायला हवा”: राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 03:32 PM2021-08-10T15:32:27+5:302021-08-10T15:34:38+5:30
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून, मंगळवारी त्यांनी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले.
श्रीनगर:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधीजम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून, मंगळवारी त्यांनी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. यानंतर राहुल गांधी यांनी गांदरबाल जिल्ह्यातील खीरभवानी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यानंतर श्रीनगर येथे परतल्यानंतर राहुल गांधी यांनी, मीदेखील काश्मिरी पंडित आहे. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्याबाबत काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. (rahul gandhi says jammu and kashmir should get full statehood)
“हा टाइमपास कशाला?”; संसदेत प्रश्न विचारण्यावरुन राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका
दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने भारतीय संविधानातील जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द केले. यानंतर जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
PM मोदींची UNSC मध्ये पंचसुत्री; रशियाने मानले भारताचे आभार, व्लादिमीर पुतिन म्हणाले...
निःपक्षपातीपणे निवडणुका व्हायला हव्यात
जम्मू-काश्मीरमध्ये निःपक्षपातीपणे निवडणुका व्हायला हव्यात. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा केंद्र सरकारने परत बहाल केला पाहिजे, अशी मागणीही राहुल गांधी यांनी यावेळी केली. खीर भवानी माता मंदिरानंतर राहुल गांधी हे मीर बाब हैदर अली दरगाह येथे गेले. तसेच डल लेकजवळ असलेल्या दरगाह हजरतबल येथेही राहुल गांधी गेले होते, अशी माहिती मिळाली आहे. राहुल गांधी यांचा हा खासगी दौरा होता. राहुल गांधी यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचे प्रभारी रजनी पाटील यांनी सांगितले.
आता बुलेट ट्रेनने अयोध्येला जाता येणार; दिल्ली-वाराणसी मार्गावर १२ स्थानके निश्चित!
दरम्यान, दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्विट केल्याने ट्विटरने नियमभंग झाल्याचा हवाला देत राहुल गांधींचे अकाऊंट तात्पुरते सस्पेंड केले होते. यानंतर ट्विटरने काँग्रेसशी संबंधित अजून एका अकाऊंटवर कारवाई केली आहे. ट्विटरने काँग्रेसचा डिजिटल चॅनेल असलेल्या आयएनसी टीव्हीच्या अकाऊंटला तात्पुरत्या स्वरूपात लॉक केले आहे. ट्विटरने सांगितले की, आयएनसी टीव्हीने काही नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांचे अकाऊंट तात्पुरते लॉक करण्यात आले.