Jitin Prasad: प्रियंका गांधींमुळे जितिन प्रसादनी काँग्रेसला 'टाटा' केला; 2019 मध्येच बीजे रोवली गेली होती...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 05:30 PM2021-06-09T17:30:18+5:302021-06-09T17:32:12+5:30

jitin Prasad left congress: जितिन प्रसाद 2019 मध्येच काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक सल होता. सुरजेवाला यांनीच समोर येत प्रसारमाध्यमांना जितिन काँग्रेस सोडत नसल्याचे सांगितले होते. परंतू जितिन काही काँग्रेस सोडत नसल्याचे सांगण्यासाठी कधीच समोर आले नाहीत. 

Rahul Gandhi's close aid Jitin Prasad left Congress Because of Priyanka Gandhi; Endured injustice since 2019 | Jitin Prasad: प्रियंका गांधींमुळे जितिन प्रसादनी काँग्रेसला 'टाटा' केला; 2019 मध्येच बीजे रोवली गेली होती...

Jitin Prasad: प्रियंका गांधींमुळे जितिन प्रसादनी काँग्रेसला 'टाटा' केला; 2019 मध्येच बीजे रोवली गेली होती...

Next

माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या जितिन प्रसाद (Jitin Prasad) यांनी काँग्रेसला टाटा करत आज भाजपात प्रवेश केला. राहुल गांधींचे (Rahul Gandhi) अत्यंत जवळचे असलेले आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठी राजकीय ताकद असलेले जितिन यांनी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यामुळे काँग्रेस सोडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळे 2022 मधील उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (Why Jitin Prasad left congress? because of Priyanka Gandhi.)

Jitin Prasad: ... म्हणून काँग्रेससोबतचा तीन पिढ्यांचा संबंध तोडला; जितिन प्रसाद यांचा भाजपात प्रवेश


जितिन प्रसाद 2019 मध्येच काँग्रेस सोडून भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक सल होता. सुरजेवाला यांनीच समोर येत प्रसारमाध्यमांना जितिन काँग्रेस सोडत नसल्याचे सांगितले होते. परंतू जितिन काही काँग्रेस सोडत नसल्याचे सांगण्यासाठी कधीच समोर आले नाहीत. 


उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ म्हणून जितिन यांना ओळखले जाते. परंतू प्रियंका गांधी यांनी जेव्हा उत्तर प्रदेशमध्य़े राजकीय हस्तक्षेपास सुरुवात केली तेव्हाच जितिन यांच्या नाराजीची बिजे रोवली गेली होती. तेव्हापासून जितिन यांना पक्षाच्या निर्णयांमध्ये बाजुला केले जाऊ लागले होते. राहुल गांधी त्यांना जेवढे महत्व देत होते, तेवढे त्यांना मिळत नव्हते. तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पाय़लट आणि जितिन प्रसाद असे काही मोजकेच तरुण नेते गांधी घराण्याच्या जवळ होते.  उत्तर प्रदेशच्या सर्व निर्णयांमध्ये जितिन असायचे. 

Jitin Prasad News: ज्योतिरादित्य शिंदेंनंतर भाजपाने पुन्हा काँग्रेस फोडली; उत्तर प्रदेशचा हा बडा नेता लागला गळाला


2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर जितिन प्रसाद यांना अध्यक्ष बनविण्याची चर्चा सुरु होती. मात्र, प्रियंका यांनी जितिनना बाजुला सारून अजय लल्लूंकडे पक्षाचे नेतृत्व सोपविले होते. एवढेच नाही तर प्रसाद यांना उत्तर प्रदेशच्या निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवले जात होते. त्यांच्या जवळच्या नेत्यांनाही जिल्हा संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. 
जितिन यांना दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने त्यांना पश्चिम बंगालचा निवडणूक प्रभारी म्हणून पाठविले होते. या साऱ्या प्रकारामुळे जितिन प्रसाद नाराज होते. 

Web Title: Rahul Gandhi's close aid Jitin Prasad left Congress Because of Priyanka Gandhi; Endured injustice since 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.