“राहुल गांधी यांना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे”; केंद्रीयमंत्री आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 12:42 PM2021-08-13T12:42:19+5:302021-08-13T12:44:06+5:30

राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे.

ramdas athawale criticised rahul gandhi over lok sabha parliament issue | “राहुल गांधी यांना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे”; केंद्रीयमंत्री आक्रमक

“राहुल गांधी यांना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे”; केंद्रीयमंत्री आक्रमक

Next

नागपूर: अलीकडेच राज्यसभेत मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यसभेतील खासदारांच्या धक्काबुक्कीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. यातच आता राहुल गांधी यांना लोकसभेतून एक वर्षासाठी निलंबित केले पाहिजे, अशी मागणी एका केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे. (ramdas athawale criticised rahul gandhi over lok sabha parliament issue)

राज्यसभेत घडलेला प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधी चुकीच्या पद्धतीने वागले आहेत, असे दावा करत यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी रिपाइंचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

“ठाकरे सरकार केंद्रावर जबाबदारी ढकलतेय, आता आढेवेढे न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा”

राहुल गांधींमुळे काँग्रेसची दुर्दशा

राहुल गांधी कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप करतात. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळेच काँग्रेस पक्षाची दुर्दशा झाली आहे. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी संसदेत दंगा घालण्याचे काम केले. संसदेत काम होऊनच द्यायचे नाही, या निर्धाराने काही लोकांना पाठवण्यात आले होते. विरोधी पक्षाचे सदस्य सतत सभागृहाच्या वेलमध्ये येत होते. या सगळ्यांना वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे, असे रामदास आठवले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानावर मस्तक टेकवतात. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा भारत उभा करायचा आहे. त्यामुळे ‘सबका साथ, सबका विकास’, हे त्यांचे धोरण असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. 

जो बायडन यांचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानात पुन्हा अमेरिकेचे सैन्य पाठवणार

दरम्यान, राज्यसभेत झालेल्या अभूतपूर्व गदारोळानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याप्रकरणी केंद्र सरकारने अहवाल सादर केला असून, सीपीआय(एम)चे खासदार इलामारम करीम यांनी पुरुष मार्शलचा गळा दाबत मारहाण केल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या खासदार फुलो देवी नेताम आणि छाया वर्मा यांनी महिला मार्शलला ओढत नेले आणि मारहाण केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
 

Web Title: ramdas athawale criticised rahul gandhi over lok sabha parliament issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.