Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत का? अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:00 PM2021-03-16T15:00:07+5:302021-03-16T15:03:20+5:30
Ajit Pawar Statement on Sachin Vaze Case: सचिन वाझे प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाविकास आघाडी सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही.
मुंबई – सचिन वाझे प्रकरणात विरोधकांना महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यात यश आलं आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू या तपासात NIA कडून विविध गोष्टीसमोर येत आहेत. यातच सचिन वाझेंविरोधात भक्कम पुरावे मिळाल्यामुळे NIA ने सचिन वाझे यांना अटक केली, त्यामुळे ठाकरे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे. यातच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.(DCM Ajit Pawar Statement on Sachin Vaze Case)
या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया आली आहे, अजित पवार म्हणाले की, सचिन वाझे प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाविकास आघाडी सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची ATS आणि NIA अशा दोन तपास संस्थांकडून चौकशी सुरू आहे. कोण कोणत्या पक्षात होतं, किंवा नव्हतं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आहे, तपासात जे काही समोर येत आहे, त्यानुसार कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितले.
“आम्हाला तोंड उघडायला लावलं तर सोनू निगम, रमेश मोरे, चंदू पटेल सगळी प्रकरणं बाहेर काढेन”
याआधीही विधानसभेत आम्ही सांगितलं होतं, विरोधी पक्षनेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्याला संध्याकाळपर्यंत अटक केली जाईल. आणि रात्रीपर्यंत आरोपीला अटक केली, तशीच कारवाई यापुढेही केली जाईल, ज्यांच्यापर्यंत धागेदोरे पोहचतील त्यांना सोडणार नाही. तपास सुरु आहे, दोषींना संरक्षण देणार नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा असो असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
Today CM said in the meeting that we will investigate all those involved and this has been accepted by all parties of the Maha Vikas Aghadi: Maharashtra Deputy CM Ajit Pawar
— ANI (@ANI) March 16, 2021
महाविकास आघाडीत मतभेद नाहीत
कोणालाही पाठिशी घालण्याचं कारण नाही, महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government) तसं करणार नाही, ज्या ज्या घटना पुढे येत आहेत, तशा पद्धतीने कारवाई करण्यात येईल, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस मिळून हे सरकार केले आहे, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चांगली चालली पाहिजे, कोणकोणत्या पक्षात आहे हा त्याचा प्रश्न आहे. तपासात कोणताही हस्तक्षेप असणार नाही, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कुठेही मतभेद नाही, आज सकाळीच बैठक झाली, त्यात नाना पटोले, मुख्यमंत्री, मी, एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख सगळेच होते, महाविकास आघाडीचं सरकार किमान समान कार्यक्रमासाठी एकत्र आलं आहे. जनतेच्या हितासाठी जे जे काही शक्य आहे ते सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे निर्णय घ्यायचे असतील ते घेतले जातील असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं आहे.
राणे अन् शिवसेना संघर्ष पेटला; शिवसैनिकांकडून भाजपा कार्यालयात कुत्रे सोडण्याचा प्रयत्न
अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना
मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं हा प्रत्येक पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे, अधिकाऱ्यांबाबत जे काही निर्णय घ्यायचा असेल तो राज्याचा प्रमुखांना अधिकार आहे. आतापर्यंतच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तशाप्रकारे निर्णय घेताना पाहिलं आहे. जी काही चौकशी सुरु आहे, तपासात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, परंतु चौकशीआधी कोणाला शिक्षा करावी हेदेखील योग्य नाही. सचिन वाझेंवर तपास यंत्रणेने आरोप लावल्यानंतर त्यांच्यावर ताबडतोब सरकारने कारवाई केली आहे, कोणत्याही अधिकाऱ्याला पाठिशी घालणार नाही, NIA आणि ATS आपपल्यापरिने तपास करत आहे असंही अजित पवार म्हणाले.