MP Bypoll Result: कमलनाथांविरोधात काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे संकेत; ज्योतिरादित्यांच्या गडात उडवली खळबळ

By हेमंत बावकर | Published: November 10, 2020 07:19 PM2020-11-10T19:19:34+5:302020-11-10T19:23:47+5:30

Madhya Pradesh Byelection Result: मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिंदेंच्या गडामध्ये 16 पैकी 7 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर एकूण 28 पैकी 9 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. यामुळे भाजपाच्या सरकारला काही धक्का बसणार नसून शिंदेंना मात्र याचा फटका बसू शकतो. 

Signs of revolt in Congress against Kamal Nath; Jyotiraditya scindia fort loss | MP Bypoll Result: कमलनाथांविरोधात काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे संकेत; ज्योतिरादित्यांच्या गडात उडवली खळबळ

MP Bypoll Result: कमलनाथांविरोधात काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे संकेत; ज्योतिरादित्यांच्या गडात उडवली खळबळ

Next

कमलनाथांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना सांभाळून न घेतल्याने आधीच नाराज असलेल्या काँग्रेस नेत्यांमध्ये पुन्हा बंडाचे वारे वाहू लागले आहेत. मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिंदेंच्या गडामध्ये 16 पैकी 7 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर एकूण 28 पैकी 9 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. यामुळे भाजपाच्या सरकारला काही धक्का बसणार नसून शिंदेंना मात्र याचा फटका बसू शकतो. 


शिंदेंच्या ग्वाल्हेर-चंबळच्या गडाला धक्का देऊनही कमलनाथांचे नेतृत्व बदल करण्याची मागणी काँग्रेसच्य़ा नेत्याने केली आहे. लाहोरचे काँग्रेसचे बडे नेते आणि कमलनाथ सरकारचे माजी मंत्री डीआर गोविंद सिंह यांनी थेट कमलनाथ यांच्यावर टीका केली आहे. 


आजचा पोटनिवडणुकीचा निकाल हा नेतृत्वाची कमतरता दाखवितो. कमलनाथांनी एका सर्व्हे करून तिकिट वाटप केले. जर सर्व नेत्यांशी चर्चा करून तिकीट वाटप केले असते तर निकाल वेगळा लागला असता. ज्या लोकांना तिकिटे देण्यात आली ते उमेदवार जनतेच्या पसंतीचे नव्हते. मी राज्य नेतृत्वाच्या बदलावर बोलू शकत नाही, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच यावर विचार करायला हवा, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज्याचे नेतृत्वच बदलायला हवे अशी मागणी केली आहे. 


दरम्य़ान कमलनाथांनी आयटम संबोधलेल्या इमरती देवी या डबरा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. इमरती देवी यांचेच नातेवाईक आणि काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांनी 4376 मतांची आघाडी घेतली आहे. इमरती देवी या ज्योतिरादित्य शिंदे यांच्या खंद्या समर्थक आहेत. 


कमलनाथांनी बोलावली बैठक
आपल्याला विरोधात बंडाचे वारे पाहून कमलनाथांनी सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे. कमलनाथांनी त्यांच्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली आहे. य बैठकीला निवडणूक झालेल्या जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, आणि 28 विधानसभा मतदारसंघातील प्रभारी तसेच काँग्रेसचे उमेदवार हजर राहणार आहेत. 

ऐन कोरोना काळात ज्योतिरादित्य शिंदे यांनी कमलनाथ यांच्याविरोधात बंड करत भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसची सत्ता गेली आणि शिवराज पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिंदे समर्थक आमदारांनी राजीनामे दिल्याने पोटनिवडणूक लागली. यामध्ये शिंदे यांच्यासमोर भाजपात प्रस्थ वाढविण्याचे आव्हान पेलावे लागले. तर दुसरीकडे सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्याचे शल्य कमलनाथ यांच्या उराशी होते. यामुळे प्रामुख्याने हे मतदारसंघ शिंदे यांचा गड असल्याने शिंदे विरोधात कमलनाथ अशीच लढाई रंगली होती. 
काँग्रेसच्या 25 आमदारांनी राजीनामा दिला होता. तर तीन आमदारांचे निधन झाल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. काँग्रेस फोडून भाजपात आलेल्या 25 आमदारांना भाजपाने पुन्हा तिकिट दिले होते. यापैकी 14 जण शिवराज सरकारमध्ये मंत्री आहेत. सत्ता टिकविण्यासाठी भाजपाला केवळ 8 जागा हव्या आहेत. तर काँग्रेसला 28 पैकी 28 जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. यामुळे सर्व जागा काँग्रेस जिंकण्याची शक्यता फार कमी आहे. 

शिंदे साईडलाईन
प्रचारावेळी जनतेतून येणार प्रतिसाद पाहून शिंदे यांना भाजपाने बाजुला केले. प्रचार आणि पोस्टरांवरूनही शिंदे यांचे फोटो कमी होऊ लागले. अखेर निवडणुकीत  ‘भाजपा है तो विश्वास है’ चा नारा देण्यात येऊ लागला, हा नारा पुढे बदलून 'शिवराज है तो विश्वास है' असा झाला होता. या गोष्टींचा परिणाम पोटनिवडणुकीतच नाही तर पुढील 2023 मधील निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Signs of revolt in Congress against Kamal Nath; Jyotiraditya scindia fort loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.