मोदी सरकारचा 'तो' निर्णयच जबाबदार; मनमोहन सिंग यांनी सांगितलं देशातील वाढत्या बेरोजगारीचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 03:53 PM2021-03-02T15:53:46+5:302021-03-02T15:55:34+5:30

Manmohan Singh on Narendra modi government : कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारचा मोठा निर्णय बेरोजगारीसाठी जबाबदार असल्याचं म्हटलं

Unemployment high in India due to govt considered demonetization decision former pm Manmohan Singh | मोदी सरकारचा 'तो' निर्णयच जबाबदार; मनमोहन सिंग यांनी सांगितलं देशातील वाढत्या बेरोजगारीचं कारण

मोदी सरकारचा 'तो' निर्णयच जबाबदार; मनमोहन सिंग यांनी सांगितलं देशातील वाढत्या बेरोजगारीचं कारण

Next
ठळक मुद्देमार्गदर्शन करताना मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारचा मोठा निर्णय बेरोजगारीसाठी जबाबदार असल्याचं म्हटलंमोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नसल्याचा मनमोहन सिंग यांचा आरोप

देशात सातत्यानं बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असल्याचं म्हणत काँग्रेसकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता असा पुनरुच्चारही केला. भाजप सरकारनं कोणताही विचार न करता घेतल्या गेलेल्या निर्णयामुळेच देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे. तसंच असंघठित क्षेत्रही मोडकळीस आलं आहे, असं ते म्हणाले. तसंच मोदी सरकार राज्यांसोबत नियमितपणे विचार-विनिमय करत नसल्याचा आरोपही मनमोहन सिंग यांनी यावेळी केला. 

केरळमध्ये राजीव गांधी डेव्हलपमेंट स्टडिजच्या व्हर्च्युअल संमेलनाचं उद्घाटनं करताना डॉ. मनमोहन सिंग यांनी यावर भाष्य केलं. "सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या तात्पुरत्या उपाययोजनांनी पतपुरवठा समस्या लपवता येणार नाही. या संकटाचा परिणाम लघु आणि मध्यम क्षेत्रावर होऊ शकतो," असं ते म्हणाले. "देशात बेरोजगारी अधिक आहे आणि असंघटीत क्षेत्र ढासळलं आहे. हे संकट २०१६ मध्ये कोणत्याही विचारांशिवाय घेण्यात आलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे उद्भवलं आहे," असंही त्यांनी नमूद केलं. 

"संघटना आणि राज्यांशी नियमितपणे सल्लामसलत करणे, ही भारताची आर्थिक आणि राजकीय आधारभूत संस्था आहे आणि घटनेत याबद्दल लिहिण्यात आलं आहे. परंतु विद्यमान केंद्र सरकार त्याला महत्त्व देत नाही," असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी केरळच्या विकासावर भाष्य केलं. तसंच भविष्यात या ठिकाणी अन्य पर्यायांवरही लक्ष देणं आवश्यक असल्याचं म्हटलं. 

बाधा पार करून पुढे जायचंय

"या ठिकाणी अनेक बाधा आहेत. यातून राज्याला पुढे न्यायाचं आहे. डिजिटल प्रणालीमुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र काम करू शकत आहे. परंतु पर्यटन क्षेत्राला कोरोनाच्या महासंकटाचा मोठा फटका बसला आहे. शिक्षण आणि आरोग्यावर लक्ष दिल्यामुळेच केरळचे लोकं देशात आणि जगातील अन्य भागांमध्ये नोकरी मिळवण्यास सक्षम झाले आहेत," असंही मनमोहन सिंग म्हणाले. 

Web Title: Unemployment high in India due to govt considered demonetization decision former pm Manmohan Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.