Video: डी के शिवकुमार यांनी नेत्याच्या कानशिलात लगावली; कर्नाटकातील राजकारण तापले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 07:28 PM2021-07-10T19:28:45+5:302021-07-10T19:30:26+5:30
Congress leader DK Shivakumar loses cool: भाजपाचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी यांनी (BJP national General Secretary CT Ravi) हा व्हिडीओ ट्विट करत राहुल गांधी यांना सवाल विचारला आहे.
बंगळुरू: कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार (DK Shivakumar) यांनी शनिवारी त्यांच्या रॅलीमध्ये असलेल्या एका नेत्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. एक व्यक्ती सेल्फी घेत होता. तो त्या नेत्याचा शिवकुमार यांच्यासोबत फोटो काढत होता. अशावेळी त्या नेत्याने शिवकुमार यांच्या बाजुला चिकटून चालत असताना कंबरेला हात लावण्याचा प्रयत्न केला. यावरून शिवकुमार चिडले आणि त्याच्या कानशिलात मारत चांगलेच सुनावले. (Congress leader DK Shivakumar loses cool, slaps party worker who tried to put hand over his shoulder)
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होताच, भाजपाने शिवकुमार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. थेट राहुल गांधी यांना टॅग करत शिवकुमार यांना हिंसा करण्याचे लायसन दिलेय का, असा सवाल केला आहे.
Karnataka CONgress President @DKShivakumar SLAPS his party worker in full public view.
— C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ (@CTRavi_BJP) July 10, 2021
If this is how the "former shishya" of Kotwal Ramachandra treats his party worker, one can imagine what he would do with Others.
Have you given DKS the "licence for violence", @RahulGandhi? pic.twitter.com/JuuSBsALwG
व्हायरल व्हिडीओमध्ये डी के शिवकुमार हे त्या व्यक्तीवर जवळ येणे आणि स्पर्श करण्यावरून संतापलेले दिसत आहेत. तुम्हाला जबाबदारीने वागायला हवे, असे ते रागात त्या नेत्याला बोलताना दिसत आहेत. हा नेता काँग्रेसचाच स्थानिक नेता होता. शिवकुमार यांनी याचे शुटिंग करणाऱ्या कॅमेरामनला ते फुटेज डिलीट करण्यास सांगितल्याचा दावा पीटीआयने केला आहे. ही घटना मांड्याच्या जिल्हा मुख्यालय भागातील आहे.
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी यांनी (BJP national General Secretary CT Ravi) हा व्हिडीओ ट्विट करत राहुल गांधी यांना सवाल विचारला आहे. शिवकुमार हे कोतवाल रामचंद्रचे अनुयायी आहेत, असेही त्यांनी म्हटले. कोतवाल रामचंद्र हा १९७० ते १९८० च्या दशकात बंगळुरुचा अंडरवर्ल्ड डॉन होता. त्याची शहरभर मोठी दहशत होती.
कोतवाल रामचंद्राचे पूर्व शिष्य पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत असे वागत असतील तर सामान्यांसोबत कसे वागतील? याची कल्पनाही न केलेली बरी. शिवकुमार यांना मारहाणीचे लायसन दिलेय का, असा सवालही त्यांनी केला आहे.