West bengal Assembly Election 2021: निवडणुकीत 'जय श्रीराम'चा नारा; योगींनी चार सभेत 80 वेळा तर अमित शाहांनी 26 वेळा घेतले रामाचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:11 AM2021-03-20T11:11:33+5:302021-03-20T11:28:17+5:30

West bengal Assembly Election 2021 : भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक नेते आपल्या प्रचारसभेत 'जय श्रीराम' ही घोषणा देत आहेत.

West Bengal Assembly Election 2021: Slogan of 'Jai Shri ram' in elections; Yogi took Rama's name 80 times in four meetings and Amit Shah 26 times | West bengal Assembly Election 2021: निवडणुकीत 'जय श्रीराम'चा नारा; योगींनी चार सभेत 80 वेळा तर अमित शाहांनी 26 वेळा घेतले रामाचे नाव

West bengal Assembly Election 2021: निवडणुकीत 'जय श्रीराम'चा नारा; योगींनी चार सभेत 80 वेळा तर अमित शाहांनी 26 वेळा घेतले रामाचे नाव

Next
ठळक मुद्देनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West bengal Assembly Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच, या निवडणुकीत 'जय श्रीराम' ही घोषणा अजूनही अव्वल स्थानी आहे. भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक नेते आपल्या प्रचारसभेत 'जय श्रीराम' ही घोषणा देत आहेत. (what is ram card why is it needed in bengal elections will the public show ram card to mamta)

आतापर्यंत योगी आदित्यनाथ यांनी बंगालमध्ये चार सभा घेतल्या आहेत. यावेळी त्यांनी 80 वेळा भगवान 'राम' यांचे नाव घेतले आहे. योगी आदित्य नाथ यांनी 2 मार्चला मादलामधील सभेत 15 वेळा रामाचे नाव घेतले. तर, 16 मार्चला पुरुलियामधील सभेत  9 वेळा, बांकुरा येथील सभेत 35 वेळा आणि पश्चिम मेदिनीपुरामधील सभेत 21 वेळा रामाचे नाव योगी आदित्यनाथ यांनी घेतले. 

विशेष म्हणजे, प्रत्येक प्रचारसभेत त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट अगदी सारखीच राहिली आहे. राम यांच्या नावापुढे गरीबी आणि विकासाचे मुद्दे मागे राहिले. बांकुराच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी रामाचा उल्लेख करत ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, कोणीही रामाला आपल्या जीवनातून वेगळे करू शकत नाही. ज्यांनी आम्हाला रामापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला, त्यांना सत्तेपासून वंचित राहावे लागेल. बंगालच्या लोकांनी आता ठरवले आहे की, ते रामाला विरोध करणार्‍या ममता दीदीला सहन करणार नाहीत.

यावर्षी अमित शाह तीन वेळा बंगाल दौर्‍यावर आले आहेत. यादरम्यान त्यांनी 6 सभा घेतल्या आहेत. त्यापैकी केवळ दोन सभामध्ये त्यांनी 26 वेळा मंचावरून जय श्री राम यांचे नाव घेतले आहे. अमित शाह यांनी गेल्या 18 फेब्रुवारीला गंगासागरच्या सभेत 10 वेळा आणि 11 फेब्रुवारीला कोचबिहारमधील सभेत 16 वेळा रामाचे नाव घेतले. गंगासागरच्या सभेदरम्यान ते म्हणाले होते की 'जय श्री राम' ही घोषणा परिवर्तनाचे प्रतिक आहे. या घोषणेसह आम्ही पश्चिम बंगालमध्ये घरोघरी जात आहोत. तसेच, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पहिल्या भेटीत 12 पेक्षा जास्त वेळा रामाचे नाव घेतले आहे.

जय श्रीराम घोषणेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर नेत्यांइतके आक्रमक दिसत नाहीत, परंतु राम यांचा उल्लेख करून आणि त्यांना बंगालशी जोडण्यात ते चुकले नाहीत. गुरुवारी त्यांनी पुरुलियाच्या सभेत श्रीरामांचा उल्लेख केला होता. त्याआधी फेब्रुवारीमध्ये झालेल्या एका सभेत मोदी म्हणाले होते की, टीएमसीने एकामागून एक अनेक फसवणूक केली आहेत. बंगालचे लोक हे पहात आहेत आणि लवकरच त्यांना राम कार्ड दाखवतील. दरम्यान,  राम कार्ड हे जय श्री राम आहे.

(दोन नेत्यांनी नाकारली भाजपची उमेदवारी; पक्ष कार्यकर्ते संतप्त)

गेल्या काही दिवसांपूर्वी 'जय श्रीराम' यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. गृहमंत्री अमित शहा आणि शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्याचा आदेश आणि घोषणा वापरण्यास बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

दुर्गाच्या राजवटीत राम कार्डची गरज का आहे?
ज्येष्ठ पत्रकार शिखा मुखर्जी यांनी सांगितले की, दुर्गाच्या नावावरही भाजपाने त्यांच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षांत भाजपानेही पंडालांचे आयोजन केले होते, परंतु भाजपाला लोकांची गर्दी जमविण्याचे काम करता आले नाही. तर आता त्याला जय श्री राम यांच्या समर्थनाची आवश्यकता आहे. जेणेकरून कठोर मतदार हिंदू मतदारांना त्यांच्या बाजूने करता येऊ शकेल. दुसरी बाजू म्हणजे बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिमा अजूनही बरीच मजबूत आहे. प्रयत्न करूनही एंटी-इन्कंबेंसी फॅक्टर तयार करण्यात भाजपा सक्षम नाही.

याचचबरोबर, ज्येष्ठ पत्रकार सुभाषिश मोइत्रा यांनी सांगितले की, राम कार्ड बंगालमध्ये जास्त चालणार नाही, कारण राम याठिकाणी दुर्गाइतके लोकप्रिय नाहीत. इथले लोक रामच्या नावावर मतदान करतील, याची शक्यता कमी आहे. भाजपा आणि टीएमसी दोघांनाही हे समजले आहे. तरीही, ते याला निवडणुकीचा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण, ध्रुवीकरण झाले तर डाव्या आणि काँग्रेसला जागा मिळणार नाही. म्हणजेच लढाई ममता आणि भाजपा यांच्यात राहील.

'...त्याचा आम्हाला फायदा होणार'
जय श्रीराम हा नारा म्हणजे परिवर्तनाचा नारा, परिवर्तनाचे लक्षण आहे. ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत हिंदूंनाही दुर्गा पूजा साजरा करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. राम नवमीमध्ये शोभा यात्रेला परवानगी नाही. आता ही घोषणा लोकांमधून येत असलेली हुकूमशाही बदलण्याचे प्रतिक आहे. यावर ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत, त्याचा आम्हाला फायदा होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहे, असे बंगाल भाजपाचे माजी अध्यक्ष राहुल सिन्हा यांचे म्हणणे आहे.

Web Title: West Bengal Assembly Election 2021: Slogan of 'Jai Shri ram' in elections; Yogi took Rama's name 80 times in four meetings and Amit Shah 26 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.