…अन् पहाटेचा शपथविधी पार पडला; अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काय संवाद झाला?

By प्रविण मरगळे | Published: November 25, 2020 05:17 PM2020-11-25T17:17:19+5:302020-11-25T17:18:46+5:30

AJit pawar & Devendra Fadanvis, Trading Power Book News: शरद पवारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय बदलून काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला

What was the dialogue between Ajit Dada and Devendra Fadnavis? Trading Powar book Revelation | …अन् पहाटेचा शपथविधी पार पडला; अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काय संवाद झाला?

…अन् पहाटेचा शपथविधी पार पडला; अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये काय संवाद झाला?

googlenewsNext
ठळक मुद्देया घडीला माझ्याकडे २८ आमदार आहेत, मी जे म्हणेन ते ते करतील तुमच्याकडे असलेलं संख्याबळ आणि अपक्ष आमदार यांच्या ताकदीवर आपण बहुमत मिळवू शकूचित भी मेरी पट भी मेरा, असं पवारांचं एकंदर धोरण दिसतंय

मुंबई – सत्तासंघर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत पहाटे शपथविधी सोहळा पार पडला, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी शपथ घेतली, अचानक घडलेल्या या राजकीय धक्क्याने अनेक जण आश्चर्यचकित झाले, मात्र अजित पवारांनी हा निर्णय का घेतला? राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र येण्याबाबत कोणत्या नेत्यांची चर्चा झाली याबाबत अनेक धक्कादायक खुलासे लेखिका प्रियम गांधी यांच्या Trading Power या पुस्तकातून करण्यात आले आहेत,

शरद पवारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय बदलून काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली, ते या पुस्तकात लिहिलं आहे, याबाबत सविस्तर वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे.

काय झाला फडणवीस आणि अजितदादांमध्ये संवाद?

देवेंद्र फडणवीस – दादा, भाजपा-राष्ट्रवादीच्या डिलला पवारसाहेबांचा पाठिंबा बहुदा मिळणार नाही असं दिसतंय, सगळीकडून आमच्या सूत्रांना हेच समजतंय, नेमकं काय चाललंय?

अजित पवार – तुम्ही म्हणताय ते खरं आहे, चित भी मेरी पट भी मेरा, असं पवारांचं एकंदर धोरण दिसतंय, त्यांना वाटतंय की, सेनेला पाठिंबा दिला तर सगळी सत्ता आपल्या हातात राहील, अशी संधी कोण बरं सोडेल?

देवेंद्र फडणवीस – तुमची भूमिका काय आहे?

अजित पवार – अजूनपर्यंत मी भाजपा आणि तुमच्याबरोबर आहे

देवेंद्र फडणवीस – तुम्ही पुरेसं संख्याबळ जमवू शकाल का?

“भाजपा आणि राष्ट्रवादीची युती का झाली नाही?; ‘ट्रेडिंग पॉवर’ पुस्तकात धक्कादायक खुलासा

अजित पवार – या घडीला माझ्याकडे २८ आमदार आहेत, मी जे म्हणेन ते ते करतील, तुमच्याकडे असलेलं संख्याबळ आणि अपक्ष आमदार यांच्या ताकदीवर आपण बहुमत मिळवू शकू

देवेंद्र फडणवीस – कोण आहेत ते आमदार?

अजित पवार – सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील तिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील शिवाय तेरा आणखी

देवेंद्र फडणवीस – या आमदारांना राज्याच्या बाहेर घेऊन जावं, असं तुम्हाला वाटतं काय? ते बाहेर सुरक्षित राहतील.

अजित पवार – नाही, नाही इथेच थांबू या, इतर आमदारांबरोबर राहिले तर कदाचित ते इतरांचे मनपरिवर्तन करू शकतील, ह्यासाठी व्यूहरचना करावी लागेल, मी माझ्या विश्वासू सहकाऱ्यांशी याविषयी बोलतो,

अजित पवार – चार आमदारांचा एक गट करू, माझ्या विश्वासातले २८ आमदार ग्रुप लीडर म्हणून काम करतील, उरलेल्या १-२ आमदारांशी बोलून त्यांचे मन वळवण्याचा काम या २८ आमदारांवर सोपवलं जाईल.

देवेंद्र फडणवीस – हा..दादा सगळं चोख पार पडलं पाहिजे, आपण फार मोठी जोखीम पत्करतो आहोत हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे, होय ना?

अशाप्रकारे लेखिका प्रियम गांधी यांनी ट्रेडिंग पॉवर या पुस्तकात खुलासा करण्यात आला आहे, २८ नोव्हेंबर रोजी हे पुस्तक प्रकाशन होणार आहे, यात राष्ट्रवादी भाजपासोबत जाण्यासाठी इच्छुक होती, स्वत: शरद पवारांनी अमित शहांसोबत दिल्लीत चर्चा केली होती, मात्र शिवसेना-काँग्रेससोबत गेल्यास राष्ट्रवादीची ताकद वाढेल या हेतूने शरद पवार यांनी आपलं मन बदललं आणि तिथेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ही खलबतं झाली

Web Title: What was the dialogue between Ajit Dada and Devendra Fadnavis? Trading Powar book Revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.