'जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही', अजित पवारही अमोल कोल्हेंच्या पाठीशी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 01:29 PM2022-01-22T13:29:37+5:302022-01-22T13:36:02+5:30
पुणे : सध्या राज्यभरात अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी केलेला नथुराम गोडसेचा (nathuram godase) अभिनय वादाचा ठरत आहे. हे प्रकरण ...
पुणे: सध्या राज्यभरात अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी केलेला नथुराम गोडसेचा (nathuram godase) अभिनय वादाचा ठरत आहे. हे प्रकरण सोशल मिडीयावर मोठा चर्चेचा मुद्दा ठरता आहे. यावर राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (ajit pawar) अमोले कोल्हेंना यावर पाठिंबा दर्शविला आहे. अजित पवार म्हणाले, मी अमोल कोल्हे याच्याशी चर्चा केली होती, मीच त्यांना पवार साहेबांकडे घेऊन गेलो होतो. मग २०१९ ला निवडणूक लढले, त्याने ती २०१७ ला भूमिका केली. त्याला आक्षेप घेण्यात अर्थ नाही, त्यामुळे कोणी पक्षात येण्याअगोदर काय केलं हे ज्याच त्याच प्रश्न आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पवार साहेब अन जितेंद्र यांनी त्यांची भूमिका मांडली आणि मी माझीही भूमिका मांडली आहे. जुन्या गोष्टी काढण्यात अर्थ नाही, त्याने एक कलावंत म्हणून त्यांनी ऑफर स्वीकारली होती, पुरोगामी विचार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारून ते राजकिय सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत.
नाना पाटेकरांनीही अमोल कोल्हेंना पाठिंबा दर्शविला आहे. नाना म्हणले, 30 वर्षापूर्वी मी देखील गोडसेचा रोल केला आहे. ती फिल्म इंग्लिश होती. मी गोडसे केला म्हणजे मी त्याचे समर्थन केलं असं होत नाही. त्यामुळे कलाकार म्हणून हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जेव्हा एखादी व्यक्ती समर्थन करते तेव्हा तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता. माझ्या उपजीविकेचं साधन तेच असल्यामुळे मला ती भूमिका करावीच लागली होती.