'कोल्हेंचा पराभव करणं सोपं नाही, तुम्ही आव्हान दिलं, पण...'; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:59 PM2023-12-27T22:59:34+5:302023-12-27T23:00:01+5:30
अमोल कोल्हे तुम्ही या लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरा, पण मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन फिरायचे आहे, असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
देशात आणि राज्यात अनेक खासदार गेल्या दोन-तीन वर्षात संसदेत अनेक प्रश्नांची मांडणी करतात, परंतु सर्वात जास्त प्रभावी मांडणी संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची आहे, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. पुण्याच्या खेड तालुक्यात आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चात जयंत पाटील बोलत होते.
इथे मोठ्या प्रमाणात तरुण पिढी उपस्थित आहेत तुम्ही फक्त युट्युबवर अमोल कोल्हे टाका आणि त्यांचे संसदेतले भाषण ऐका ते कोणत्या विषयावर बोलले नाही असं कधीच झाले नाही त्यांनी जे काही प्रश्न मांडले ते नेहमी प्रभावीपणेच मांडले, असं जयंत पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या विधानावर देखील प्रतिक्रिया दिली.
आज काही लोक अमोल कोल्हे यांना पराभव करायचा प्रयत्न करत आहेत. ज्या व्यक्तीने शिवाजी महाराजांना घरापर्यंत पोहचवले त्यांना पराभूत करणे सोपे नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच तुम्ही आव्हान दिलं पण यात दुरुस्ती व्हायला हवी अशी अपेक्षा आहे, असंही ते म्हणाले. संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांची खरी ओळख अमोल कोल्हेंनी जनतेला करून दिली. अमोल कोल्हे तुम्ही या लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरा, पण मला तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन फिरायचे आहे, असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
शेतकरी आक्रोश मोर्चाच्या पहिल्या दिवसाची सांगता चाकण येथे मशाल मोर्चाने प्रदेशाध्यक्ष आमदार मा. श्री. जयंतराव पाटील व संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. #शेतकरी_आक्रोश_मोर्चा#ShetkariAkroshMorchapic.twitter.com/6zjZoy7gwV
— NCP (@NCPspeaks) December 27, 2023
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
५ वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केलं होतं. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होतं. मी बोलणार नव्हतो. पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पद यात्रा सुचते कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे. आम्हाला वाटले होते ते वक्ते उत्तम आहे. संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती. शिरूरमध्ये पर्याय देणार, तुम्ही काळजीच करू नका तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी यावेळी दाखवला आहे.
दादा त्या ५ वर्षांचं आता का बोलले?
दादांनी माझी नेहमीच पाठराखण केली आहे. आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेतृत्वावर बोलणं माझ्यासाठी उचित ठरणार नाही. काही चुकलं तर कान पकडण्याचा अधिकार आहे. पहिल्याच टर्म मध्ये २ वेळा संसदरत्न मिळाला, बैलगाडा शर्यत प्रश्न सोडवला, संसदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं, तेव्हा जर काही चुकलं असत तर त्यांनी कान धरले असते. कोविडच्या काळात दादा सर्वाधिक बैठक घेत होते. त्यावेळी कोण अटेंड्स करत होत. हे त्यांनाही माहित आहे. इंद्रायणी प्रकल्प कोणी पुढाकार घेतला हे दादांना माहित असेलच. चार पाच वर्षात मी काम केलं नसत तर त्यांनी तेव्हाच माझे कान धरले असते. ते आता का बोलले हा प्रश्न मला पडतोय.