PDCC Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पॅनल ठरवण्यासाठी राजकीय खलबते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 12:25 PM2021-12-11T12:25:15+5:302021-12-11T12:27:34+5:30

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन पॅनमध्ये लढत होणार आहे

political turmoil decide panel in pune district bank elections | PDCC Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पॅनल ठरवण्यासाठी राजकीय खलबते

PDCC Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पॅनल ठरवण्यासाठी राजकीय खलबते

Next

पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारांचे पॅनल ठरवण्यासाठी राजकीय खलबते सुरू झाली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शिवाई बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर पुन्हा उशीरापर्यंत सर्किट हाऊसवर बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल निश्चित करण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी जाहीर केली. तर भाजपकडून उमेदवारांचे पॅनल ठरवण्यासाठी पुणे महापौर बंगल्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील प्रमुख आणि उमेदवारांची बैठक बोलावली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन पॅनमध्ये लढत होणार आहे. बँकेवर सोसायटी अ गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार तर काँग्रेसचे दोन संचालक आतापर्यंत बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत इच्छुकांची मोठी संख्या आणि चुरस लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व गटांमध्ये उमेदवारांचे पॅनेल जाहीर करण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या क्वींस गार्डन येथील शिवाई बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार गृहमंत्री वळसे पाटील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आणि स्नेह भोजन झाले. भाजपकडून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तयारी करण्यात आली. सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नसले तरी पक्षाच्या वतीने ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी इच्छुक उमेदवार आणि प्रमुख नेत्यांची बैठक महापौर बंगल्यावर बोलवली आहे. त्यामध्ये पक्षाच्या पॅनल तर्फे लढणाऱ्या उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल 
अ वर्ग मतदार संघ 
बारामती - अजित पवार (बिनविरोध )
आंबेगाव- दिलीप वळसे-पाटील ( बिनविरोध)
भोर - संग्राम थोपटे (काँग्रेस- बिनविरोध)
पुरंदर- संजय जगताप (काँग्रेस- बिनविरोध)
वेल्हा - रेवणनाथ दारवटकर ( बिनविरोध)
मावळ - ज्ञानोबा दाभाडे (बिनविरोध)
खेड - दिलीप मोहिते-पाटील 
शिरूर- अशोक पवार 
दौंड- रमेश थोरात 
जुन्नर- संजय काळे
मुळशी - सुनिल चांदेरे
इंदापूर- रणजित निंबाळकर 
हवेली - मैत्रीपूर्ण लढत ( ज्येष्ठ संचालक प्रकाश म्हस्के व विकास दांगट रिंगणात )
- ब वर्ग मतदार संघ  : दत्तात्रय भरणे (इंदापूर)
- क वर्ग मतदार संघ : सुलेश घुले ( हवेली)
- ड वर्ग मतदार संघ : दिगंबर दुर्गाडे (पुरंदर) 
- अनुसूचित जाती -जमाती: प्रविण शिंदे (हवेली)
- इतर मागासवर्गीय मतदार संघ  : संभाजी होळकर (बारामती)
- विभक्त जाती व भटक्या जमाती मतदार संघ  : दत्तात्रय येळे (बारामती)
- महिला प्रतिनिधी : 1) पुजा बुट्टेपाटील ( जुन्नर)
                            2) निर्मला जागडे (वेल्हा) 

Web Title: political turmoil decide panel in pune district bank elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.